मोदी शासनाचे नव वर्ष म्हणजेच सुशासनाचे वर्ष-प्रदीप पडोळे

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : मोदी शासनाचे ९ वर्ष म्हणजेच यशस्वी शासनाचे वर्ष असे प्रतिपादन तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे क्षेत्र प्रमुख तथा तुमसरचे माजी नगराध्यक्ष इंजिनीयर प्रदीप पडोळे यांनी तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे व्यापारी व ज्येष्ठ कार्यकर्त्यांना संबोधित करतांनी केले. मोदी सरकारची ९ वर्ष पूर्ती सेवा, सुशासन व गरिबांचे कल्याण या कार्यक्रमानिमित्त आयोजित संमेलनात ते बोलत होते. या संमेलनाचे आयोजन भारतीय जनता पार्टी तुमसरच्या जनसंपर्क कार्यालयात २४ जून रोजी करण्यात आले होते. या संमेलनात तुमसर मोहाडीविधानसभा क्षेत्राचे व्यापारी व ज्येष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वप्रथम या संमेलनात डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनही करण्यात आले. या संमेलनाला प्रमुख वक्ते म्हणून भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शिवराम गिरीपुंजे, इंजी.प्रदीप पडोळे, माजी खासदार शिशुपाल पटले, भाजप व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष मयूर बिसने, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. हरेन्द्र रहांगडाले, तुमसर येथील प्रतिष्ठित व्यापारी पवन मलेवार यांनी संबोधित केले. यात मोदी सरकारच्या ९ वर्षातझालेल्या विकासाची यशस्वी कामे व विविध योजने बद्दलची माहिती जनते पर्यंत कशी पोचली पाहीजे यावर सुद्धा सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी या कार्यक्रमाला महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सौ. गिर्ता कोंडेवार, तुमसर तालुका अध्यक्ष कांशीराम टेंभरे, मोहाड़ी तालुका अध्यक्ष भगवान चांदेवार, तुमसर शहर अध्यक्ष पंकज बालपांडे, जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना पुंडे, जिल्हा सचिव गजानन निनावे, तुमसर शहर अध्यक्ष पंकज बालपांडे, आशीष कुकडे, अमरीश सानेकर, सुनील लांजेवार, मयूरध्वज गौतम, रामराव कारेमोरे, आनंद जैसवाल, पंचायत समिति सदस्य लक्ष्मी कांत सेलोकर, उप सरपंच सलाम शेख, शक्ती प्रमुख दिनेश कामथे, कालु निनावे, तुमसर महिला मोर्चा अध्यक्ष सौ.प्रीति मलेवार, सौ.कल्याणी भुरे, सौ.कुंदाताई वैद्य, सौ.शोभा लांजेवार यांच्यासह तुमसरमोहाड़ी विधानसभा क्षेत्रातील व्यापारी वर्ग व जेष्ठ कार्यकर्ते तसेच भारतीय जनता पाटीर्चे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.