तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्रातील लोकांचा लाभार्थी मेळावा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : मोदी सरकार च्या ९ वर्षपूर्ती निमित्त सेवा सुशासन, गरीब कल्याण या निमित्त तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्रातील लोकांचा लाभार्थी मेळावा घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे, तुमसर-मोहाड़ी विधानसभा सभाचे प्रमुख इंजी.प्रदीप पडोळे, माजी खासदार शिशुपाल पटले, लाभार्थी मेळावाचे विधानसभा प्रमुख मुन्ना पुंडे यांनी संबोधित करून मोदी सरकारच्या यशस्वी ९ वर्षात झालेल्या विकासकामाच्या व विविध योजनाच्या माध्यमातुन लोकांना मिळालेल्या कल्याणकारी लाभकारी योजनेची माहिती दिली व लोकांपर्यंत ही माहिती कशी गेली पाहीजे या करिता लाभार्थी लोकांना मार्गदर्शन केले.

यावेळी या कार्यक्रमाला महिलामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सौ.गिता कोंडेवार, तुमसर तालुका अध्यक्ष कांशीराम टेंभरे, मोहाड़ी तालुका अध्यक्ष भगवान चांदेवार, तुमसर शहर अध्यक्ष पंकज बालपांडे, जिल्हा परिषद सदस्य बंडूभाऊ बनकर, दिलीप सार्वे, भाऊराव तुमसरे, डॉ. हरेंद्र रहांगडाले, आशीष कुकडे, अमरीश सानेकर, सुनील लांजेवार, मयूरध्वज गौतम, रामराव कारेमोरे, पंचायत समिती सदस्य लक्ष्मीकांत सेलोकर, बाबूभाऊ ठवकर, डॉ. अशोक पटले, गजानन निनावे, भोजराम पारधी, संतोष वहिले, पवन पाटील, अन्नू रोचवानी, तुमसर महिला मोर्चा अध्यक्ष सौ.प्रीति मलेवार, सौ.कल्याणी भुरे, सौ.कुंदा वैद्य, सौ.शोभा लांजेवार यांच्यासह तुमसरमोहाडी विधानसभा क्षेत्रातील लाभार्थी तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.