तिडके महाविद्यालयात छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी रामटेक : श्री.नरेंद्र तिडके महाविद्यालय रामटेक येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संगीता टक्कामोरे या होत्या.याप्रसंगी प्रा.नरेश आंबिलकर यांनी छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानात केलेल्या विविध सुधारणांची माहिती सांगितली. डॉ. श्रीकांत भोवते यांनी छत्रपती शाहू महाराजांनी सुरू केलेल्या आरक्षणामुळेच आज ओबीसी समाजाची प्रगती झाल्याची सांगितले. अध्यक्षीय भाषणातून प्राचार्यांनी छत्रपती शाहू महाराजांनी स्त्रियांसाठी केलेल्या कायद्यांची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालक प्रा.अमरीश ठाकरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ.दिलीप् ाकुमार जेना यांनी मानले. कार्यक्रमाला प्रा.स्वप्निल मनघे, डॉ.मनोज तेलरांध ,प्रा. कल्पना पटेल,प्रा.सुनील कठाणे, विक्की कुचेकर,उर्मिला सोनवाने उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.