आषाढी एकादशीनिमीत्त सात बहीणी उत्सव कार्यक्रम

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : जय माता दी सात बहिणी (भवानी) माता मंदीर व वार्षिक उत्सव तुमसर रोड, मोहाडी येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुध्दा सात बहीणी उत्सव आषाढी एकादशी निमीत्त कार्यक्रम गुरुवार दि.२९ व ३० जून २०२३ पर्यंत पुढीलप्रमाणे आयोजित करण्यात आलेला आहे.

कार्यक्रम गुरुवार दि.२९ जून २०२३ ला सकाळी ७ ते ८ वाजता, अभिषेक पुजा सकाळी १० ते १२ वाजता झेंडा व दिपप्रज्वलन श्री प्रभु कुंभारे भजन मंडळ मोहाडी यांच्यावतीने दुपारी १२ ते २ वाजता, जागृती कार्यकम दुपारी २ वाजता श्री संत सम्मेलन व भजन संमेलन भजन, सायंकाळी ७ वाजता सामुदायीक प्रार्थना शंकरराव चोपडे यांचे आध्यात्मिक विषयावर प्रबोधन, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे मानसपुत्र भोलाराम बाबा रामपायली (बालाघाट), शामराव गौरी महाराज यांचे प्रबोधन, सुरेश महाराज (ग्रामगीता प्रचारक व खंजेरी वादक) रात्री ८ वाजता भाऊड, हभ.प. लिला तिजारे सिरसाळ, ता. पवनी, जि.भंडारा, ह.भ.प.रायपुरकर महाराज यांचे प्रवचन. शुक्रवार दि.३० जून २०२३ लासकाळी ६ वाजता ध्यान कार्यक्रम,सकाळी ८ वाजता प्रबोधन मोलाराम बाबा रामपायली (बालाघाट) यांचे सकाळी १० ते ११ वाजता हवनकार्य सकाळी ११ ते २ वाजता दहीकाला कार्यक्रम व स्वागत समारंभ, ह.भ.प.केसर नेरकर यांचे कार्यक्रम साथसंगत उमेश व सुर्यभान बागरे महाराज यांचे, दुपारी १ वाजता दहीहंडी कार्यक्रम, देणगीदात्यासाठी स्नेहभोजन दुपारी २ ते ५ वाजता. कार्यक्रमामध्ये फेरबदल करण्याचा अधिकार उत्सव समितीला राहील. या वार्षिक उत्सवाचा कार्यक्रमाचा लाभ देणगीदात्यानी घ्यावा असे सात बहिणी उत्सव समिती व माविक भक्तगण यांनी केले आहे. असे यादोराव थोटे यांनी कळविले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.