बीआरएस नेत्यांनी घेतली खातखेडा येथील पिडीत कुटूंबियांची भेट

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : वाघाच्या हल्ल्यात झाला होता मृत्यू तालुक्यातील गुडेगाव, खातखेडा गावात दिवसा ढवळ्या अगदी गावालगत शेतात शेळया चारत असतांना पट्टेदार नरभक्षक वाघाने सुधाकर सीताराम कांबळे व ईश्वर सोमा मोटघरे यांच्या वर झडप घालून ठार केले. तसेच नांदीखेडा येथील गुरुदास उईके या युवकाला जखमी केले. भारत राष्ट्र समिती भंडारा च्या पदाधिकाºयांनी पिडीत कुटूंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी वाघाच्या हल्ल्यात ठार व जखमी झालेल्या कुटुंबांना लवकरात लवकर शासकीय मदत मिळावी याकरीता संबंधीत विभागांशी चर्चा करून दिशानिर्देश देण्यात आले. या प्रकरणात संबंधित विभागाकडून ग्रामस्थांना होत असलेला नाहक त्रास त्वरित बंद व्हावा यासाठी उपस्थित नागरीकांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र राज्य पक्षाचे मार्गदर्शक माजी आमदार चरणभाऊ वाघमारे, माजी जि. प. सदस्य बीआरएस भंडारा विधानसभा समन्वयक अरविंदभाऊ भालाधरे, बीआरएस चे वरिष्ठ नेते धनंजय मोहकर, प्रकाश महालगावे, पवनी तालुका समन्वयक राहुल फुंडे, राजु रेवतकर, शेरु भुरे, महेश बोरकर, नितीन नागदेवे, नितीन हटवार, पवन शीलार, तेजस खोब्रागडे, पितांबर बागडे, संकुल शहारे, आदेश वाणी, जनार्धन बावणे, रुपेश पंचबुद्धे, अभिषेक मेश्राम, अनिल वैद्य, मनोज बागडे, दिलीप चिलबुले, सोनू काटेखाये, पांडुरंग मेश्राम, एकनाथ काटेखाये, गुडेगाव सरपंच गणवीर, खातखेडा सरपंच गोवर्धन मडावी, तसेच बीआरएसचे कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.