पीयुसी नसेल तर वाहन अपघात विमा नाही

वृत्तसंस्था नवी दिल्ली : वाहनांचा अपघात झाल्यास आता विम्याचा दावा करण्यासाठी वाहन प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र अर्थात पीयुसी अनिवार्य असणार आहे. त्यामुळे पीयूसी प्रमाणपत्र नसेल तर २० आॅगस्टपासून विमा कंपन्यानी विमा पॉलिसीचे नूतनीकरण करु नये, असे आदेश भारतीय विमा प्राधिकरणाने (आयआरडीए) विमा कंपन्यांना दिले आहेत. यासंदर्भात आयआरडीएने नो-ि टफिकेशन जाहीर केले आहे. आयआरडीएने विमा कंपन्यांसाठी काढलेल्या नोटिफिकेशनमध्ये म्हटलं की, ह्यसुप्रीम कोर्टाच्या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यात यावी. त्यानुसार, विम्याच्या नुतनीकरणासाठी वाहन मालकाकडे पोल्यूशन अंडर कंट्रोल सर्टीफिकेट (पीयूसी) असणं गरजेचं आहे.

वाहनांचा विमा काढण्यासाठी यापुढे हे प्रमाणपत्र ग्राहकांना विमा कंपन्यांना द्यावं लागेलं. आयआरडीएने २० आॅगस्ट रोजी या संदर्भात नोटिफिकेशन प्रसिद्ध केलं आहे. तसेच कंपन्या आणि ग्राहकांना सुप्रीम कोर्टाच्या निदेर्शांचं कसोशीनं पालन करण्यास सांगितलं आहे. सुप्रीम कोटार्ने विमा कंपन्यांना आदेश दिले होते की, त्यांनी संबंधित वाहनाची पीयूसी तपासल्याशिवाय विम्याचे नूतनीकरण करु नये. त्यामुळे पीयूसीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास १०,००० रुपये दंड लावला जात आहे. प्रदुषण रोखण्यासाठी प्रत्येक वाहनाला त्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या मानकांनुसार तपासले जाते. त्यासाठी प्रदुषण तपासणी केंद्र असतात, ही तपासणी केंद्रं प्रामुख्याने पेट्रोल पंपांवर असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *