वच्छ सर्वेक्षणांतर्गत भंडारा जिल्ह्यातील १५ गावांची पडताळणी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : स्वछ सर्वेक्षण ग्रामीण २०२३ अंतर्गत स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा २ च्या माध्यमातून हागणदारीमुक्त प्लसच्या दिशेने वाटचाल करताना ग्रामस्तरावर निर्माण होणाºया वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता सुविधांची पडताळणी नुकतीच पार पडली. भंडारा जिल्ह्यातील १५ गावांची पडताळणी अकोला जिल्हा परिषदेच्या चमूने केली. या चमूमध्ये क्षमता बांधणी तज्ञ प्रवीण पाचपोर, स्वच्छता तज्ञ सागर टाकले, संनियंत्रण व मुल्यमापण तज्ञ राहूल गोडले यांचा समावेश होता. तीन दिवसाच्या पडताळणीमध्ये या चमूने गावात वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता सुविधांची पाहणी करण्याकरीता गृहभेटी, ग्राम पंचायत व विविध समित्यांच्या पदाधिकारी, गावस्तरावर कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचेशी संवाद साधला. पहिल्या टप्यात हागणदारीमुक्तीचे उदिष्ठ पूर्ण केल्यानंतर भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. समीर एम. कुर्तकोटी यांचे मार्गदर्शनात उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) मा. एम. एस. चव्हाण यांचे नेृत्वात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा २ या कार्यक्रमाची भंडारा जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू आहे. या कार्यक्रमांतर्गत गावस्तरावर सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाकरीता पुढाकार घेण्यात आलेला आहे.

गावस्तरावर वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे. तसेच काही गावात स्वच्छता सुविधांची निर्मिती करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमाचे माध्यमातून गावात उत्कृष्ठ कामे केलेल्या गावांची स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२३ या कार्यक्रमांतर्गत निवड करावयाची आहे. त्यामुळे यापूर्वी तालुका व जिल्हास्तरीय चमूने गावांची तपासणी पूर्ण करून १५ ग्राम गावे राज्यस्तरीय पडताळणी करीता पाठविण्यात आले होते. जिल्ह्यातील उत्कृष्ठ ग्राम पंचायतींची निवड करण्याकरीता राज्यस्तरीय चमूद्वारे नुकतीच भंडारा जिल्ह्यातील १५ गावांची पडताळणी पार पडली. अकोला जिल्हा परिषदेच्या, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे क्षमता बांधणी तज्ञ प्रवीण पाचपोर, स्वच्छता तज्ञ सागर टाकले, संनियंत्रण व मुल्यमापण तज्ञ राहूल गोडले यांनी पडताळणी पूर्ण केली आहे. राज्यस्तरीय पडताळणी चमूने मोहाडी तालुक्यातील नेरी, सितेपार (पांढराबोडी) पालडोंगरी, वरठी, भंडारा तालुक्यातील बेला, गणेशपूर, ठाणा, साकोली तालुक्यातील खैरी, बोडे, शिवणीबांध, लाखनी तालुक्यातील गडेगाव, पवनी तालुक्यातील आकोट, मोखारा तर लाखांदूर तालुक्यातील मोहरणा, दिघोरी मोठी आदी पंधरा गावांची स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२३ अंतर्गत पताडळणी पूर्ण करण्यात आली.

चमूने ग्रामपंचायत स्तरावरील कुटुंबांचे सर्वेक्षण करुन शौचालयाची पहाणी करून वापराबाबत खात्री केली. कुटुंबस्तरावर निर्माण होणाºया कचरा व्यवस्थापन जसे वर्गीकरण व संकलनाबाबत माहिती घेतली. सार्वजनिक ठिकाणे जसे शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्राम पंचायत व अन्य ठिकाणांना प्रत्यक्ष भेटी देऊन घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची पाहणी करीत व्यवस्थापनाबाबत त्या ठिकाणी कार्यरत यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाºयांशी संवाद साधला. तसेच शौचालय व पांण्याची सुविधांची तपासणी करण्यात आली. तीन दिवसाच्या तपासणी मध्ये चमूने स्वच्छता सुविधांची पाहणी व ग्राम पंचायत व विविध समित्यांचे पदाधिकारी, कार्यरत यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी यांचेशी संवाद साधून जिल्ह्याची स्वच्छता विषयक परिस्थीती जाणून घेतली. राज्यस्तरीय चमू १५ गावांच्या तपासणीचा अहवाल लवकरच राज्याला सादर करण्यात येणार आहे. तपासणीवेळी चमूसोबत गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे शालेय आरोग्य तज्ञ उषा वाडीभस्मे, गट समन्वयक, समुह समन्वयक यांची उपस्थिती होती.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.