राशन दुकानातून मक्का नको गव्हाचे वाटप करा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्याच्या जनतेच्या उदरनिर्वाहाचा विचार केला तर जिल्ह्यातील जनता भात, भाजी व पोळीवरच उदरनिर्वाह करीत असून मक्याचा काहीच उपयोग नसल्याने राशन दुकानातून मक्का न देता पुर्ववत गहूच देण्यात यावे, अशी मागणी भंडारा शहर काँग्रेसच्या वतीने करण्यात आले असून या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री तसेच अन्न पुरवठा मंत्री यांना देण्यात आले. जिल्हा हा भात पिकांचा जिल्हा असुन जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी भात पिक निघाल्यावर गव्हाची पेरणी करतात. व आपल्या उदरनिर्वाहाची पुर्ती करतात. यामुळे जिल्ह्यातील बहुतांश लोकांच्या आहारात भात, भाजी व पोळीच पाहायला मिळते. जे व्यक्ति ठलवे, गरीब, व अल्पभुधारक आहेत. त्या लोकांना शासकिय राशन दुकानामधुन गहु व तांदुळ मिळत असल्यामुळे त्यांचे पण दररोज चे आहार भात, पोळी, भाजी असुन ते शासकिय दुकानातुन मिळणाºया राशनावर आपली उपजिविका करतात. परंतु महाराष्ट्र सरकारनी या महिन्यात गहू ऐवजी मक्क्याचे वाटप राशन दुकानातुन केली आहे.

यातच मका हा जिल्हावासियांचा खाद्य तर नाहीच परंतु राशन दुकानामधुन मिळणारा मक्का अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे. एवढेच नाही तर मक्क्याकडे पाहिल्यावर असे वाटते की, या मक्क्याला गाई, म्हशी पण खाणार नाही. इतकी मक्क्याची स्थिती खराब आहे. तसेच मक्का हा भंडारा जिल्हा वासियांचा आहार नसुन राशन दुकानातुन जनता मका घ्यायला पण मागे पुढे पाहतात. जनतेचा उदरनिवार्हाची समस्या पाहताच भंडारा शहर कांग्रेस कमेटी ने महाराष्ट्र राज्यांचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ सिंधे तथा राज्याचे अन्न पुरवठा मंत्री ना. छगनजी भुजबळ यांना भंडारा जिल्हा अधिकारी मार्फत विनंतीवजा मागणी केली की, भंडारा जिल्ह्याच्या जनतेच्या उदरनिवार्हाच्या समस्येचे निराकरण व्हावे व जिल्ह्यातिल जनतेला राशन दुकानातुन मक्का ऐवजी पुर्ववत गहुच मिळावे. निवेदन देतांना कांग्रेस कमेटी भंडारा शहर अध्यक्ष प्रशांत देशकर, धनराज साठवने, मेहमुदभाई खान, नरेंद्र साकुरे, जिवन भजनकर, राजविलास बोरकर, किशोर राऊत, सुनिल नागपुरे इत्यादि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.