युवकाची आत्महत्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : स्वत:च्या राहत्या घरी कोणी सदस्य नसल्याचा फायदा घेत एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. ही घटना २५ जुलै रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास तालुक्यातील इंदोरा येथे उघडकीस आली आहे या घटनेत स्थानिक इंदोरा येथील रोशन ठलाल (२६) नामक युवकाचा मृत्यू झाला आहे. पोलीस सूत्रानुसार, घटनेतील मृतक युवक रोशन तालुक्यातील इंदोरा येथे आईसोबत राहत होता. घटनेच्या दिवशी रोशनची आई शेतशिवारात गेली असल्याने रोशनने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तथापि या घटनेची माहिती रोशनच्या कुटुंबीयांसह नागरिकांना व पोलिसांना मिळताच पोलीस उप निरीक्षक कोल्हे व पोलिस अंमलदार टेकाम यांनी घटनास्थळी पोहोचत घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. वृत्त लिहीस्तोवर मृत्यूचे कारण कळले नसून या घटनेत लाखांदूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.