राज्यात १३ टक्के रुग्ण ‘ऑक्सीज़न’ वर

प्रतिनिधी मुंबई : राज्यात कोरोनाचा कहर वाढत असून आता औषधांबरोबरच आॅक्सिजनचाही तुटवडा निर्माण झाला आहे. गेल्या १५ दिवसात रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. साहजिकच गंभीर रुग्णांची संख्याही वाढत असून त्यांना आॅक्सिजनची गरज पडत आहे. आजच्या घडीला एकूण रुग्णांपैकी १३ टक्के रुग्णांना आॅक्सिजनची गरज भासत असल्याची माहिती राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली. म्हणजेच राज्यात आॅक्सिजनची गरज वाढली असून आॅक्सिजनची कमतरता भासत आहे. राज्यात पुरेसा आॅक्सिजनसाठा आहे मात्र, त्याच्या वितरणात अडथळे येत असल्याने आॅक्सिजनची कमतरता असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ही परिस्थितीही लवकरच सुधारेल. कारण आता वितरणातील सर्व अडथळे दूर करण्यात आले आहेत. राज्यात आठवड्याभरात १४ जिल्ह्यात लिक्विड आॅक्सिजन प्लांट तयार करण्यात आले असून १६ जिल्ह्यात आॅक्सिजन लिक्विड प्लांटचे काम सुरू आहे. हे १६ प्लांट लवकरच सुरू होतील, असेही डॉ. आवटे यांनी सांगितले.

कोरोना हा श्वसनसंस्थेचा आजार असून सध्या तरी यावर कोणताही रामबाण उपाय व औषध नाही. त्यामुळे गंभीर झालेल्या रुग्णांना आॅक्सिजनची गरज भासते. सध्या राज्यात २ लाख ७९ हजार ७६८ अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. यातील १३ टक्के लोकांना आॅक्सिजनची गरज भासत असल्याचे डॉ. आवटे यांनी सांगितले. रुग्णवाढीचा अंदाज घेत आॅक्सिजनची आणि आॅक्सिजन बेडची गरज वाढणार आहे, हे आरोग्य विभागाला दोन महिन्यांपूर्वीच समजले होते. त्यादृष्टीने तयारी सुरू केली होती. त्यानुसार सर्व जिल्हे आणि महानगरपालिकेकडून १५१५ दिवसाने रुग्णवाढ, बरे होणारे रुग्ण, गंभीर रुग्ण यांची आकडेवारी जमा करणे सुरू होते. त्यावरून पुढच्या १५ दिवसात तेथे किती रुग्ण वाढतील आणि यातील किती रुग्णांना आॅक्सिजन बेड, आॅक्सिजन लागेल याचा एक अंदाज काढला जात आहे.

या अंदाजानुसार जिल्हाधिकारी व पालिका आयुक्तांना आॅक्सिजन बेडआॅक् िसजनचा साठा वाढवण्याचे आदेश देणे सुरू आहे, असे डॉ. आवटे यांनी सांगितले. आॅक्सिजनची मागणी या दोन महिन्यात दुपटीने वाढली आहे, हे खरे आहे. मात्र, राज्यात आॅक्सिजनचा साठा कमी आहे किंवा आॅक्सिजनचा पुरवठा कमी आहे असे नाही. आॅक्सिजनचा पुरेसा साठा राज्यात असून पुढे लागणाºया आॅक्सिजनची तरतूद करण्यात येत आहे. मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद या जिल्ह्यांत आॅक्सिजनचे सर्वाधिक मोठे प्लांट आहेत.

येथून राज्याच्या कानाकोपºयात आॅक्सिजन पुरवण्यास विलंब होत आहे. मात्र, आता वितरणातील अडथळेही दूर करण्यात आल्याचे डॉ. आवटे यांनी स्पष्ट केले.येथे आहे आॅक्सिजनची कमतरता -प्लांट दूर असल्याने काही ठराविक जिल्ह्यात आॅक्सिजनचे वितरण करण्यास विलंब होत आहे. त्यानुसार नागपूर, अमरावती, लातूर, उस्मानाबाद, बीड येथे आॅक्सिजनची कमतरता भासत आहे. तेव्हा या जिल्ह्यात आॅक्सिजनचे वितरण कसे वेळेत करता येईल, याकडेही आता विशेष लक्ष दिल जात आहे, अशी माहिती डॉ. आवटे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *