आजपासून संसदेचे अधिवेशन

वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसदेच्या अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे. कोरोना काळात होणाºया या संसदेच्या अधिवेशनात अनेक गोष्टी पहिल्यांदाच घडणार आहेत. त्यासाठी वेगवेगळी व्यवस्थाही करण्यात येत आहे. नेमके काय बदल, आणि कुठल्या महत्वाच्या विधेयकांची चर्चा या अधिवेशनात अपेक्षित आहे. कोरोना काळात संसदेचं ऐतिहासिक अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. राज्यसभा सकाळी ९ ते १ आणि लोकसभा दुपारी ३ ते ७ अशा दोन सत्रांमध्ये हे कामकाज होणार आहे. कोरोना पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच एका सभागृहाच्या कामकाजासाठी दोन सभागृहं वापरली जाणार आहेत. म्हणजे लोकसभेचे कामकाज सुरु असताना लोकसभेचे खासदार राज्यसभेतही बसलेले आढळलेले आढळतील. या अधिवेशनात सरकार एकूण २३ विधेयकं सादर करणार आहे. त्यापैकी ११ हे अध्यादेश आहेत. डॉक्टर, नर्सेस, आशा वर्कर्स यांच्यावर हल्ला केल्यास शिक्षा अधिक कडक करणारे विधेयक. असा हल्ला हा अजामीनपात्रा गुन्हा असेल, त्यात जास्तीत जास्त ७ वर्षांची शिक्षा आणि ५ लाख रुपये दंडाची तरतदू आहे. याशिवाय कोरोना काळात खासदारांच्या वेतनात ३० टक्के कपात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *