नागपुरात पावसाचा हाहाकार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : यंदाच्या पावसाळ्यात उर्वरित विदर्भासह सर्वत्र जोरदार पाऊस सुरू होता. नागपुरात मात्र समाधानकारक पाऊस झाला नव्हता; परंतु मागील काही दिवसांत नागपुरात पावसाने कहर केला. बुधवारी रात्री तर पावसाने अक्षरश: हाहाकार माजविला. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाºयासह धुवांधार बरसलेला हा पाऊस गेल्या २९ वर्षांतील विक्रम मोडीत काढणारा ठरला. या पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झालीत. अनेक भागांतील वस्त्यांत पाणी शिरले. पुरात दोन जण वाहून गेल्याचीही माहिती आहे. दरम्यान, पुढील काही दिवस असाच पाऊस राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दिवसभर बºयापैकी निरभह्य असलेले आकाश बुधवारी रात्री अचानक ढगांनी झाकोळून आले. रात्री १० वाजेपासून विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रात्रभर मुक्कामी राहिलेला हा पाऊस गुरुवारी सकाळपर्यंत अविरत सुरू होता. परिणामी शहराच्या सखल भागांतील वस्त्यांतील घरांत पावसाचे पाणी घुसले. यात वर्धमाननगर, शांतीनगर, पारडी, भरतवाडा, शिवशंभूनगर, मनीषनगर,नरेंद्रनगर, पडोळे चौक, सूर्यानगर, बेसा, बेलतरोडी, कळमना, सोनेगाव या भागाला सर्वाधिक फटका बसला. तसेच विमानतळावर प्रवेश करणारा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. बेसा व जाटतरोडीच्या नाल्यात प्रत्येकी एक व्यक्ती पाण्यात वाहून गेल्याची माहिती आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.