जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाची रूग्णवाहिकेने वाचविले प्राण

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा ते रायपुर महामार्गावर लाखनीजवळ रविवारी भीषण अपघात झाला. रात्री ९.१५ वाजता मोरगाव राजेगाव वरून लाखनीकडे प्रवास करीत असताना गाडी क्र.एमएच ३६- १५३६ या गाडीला समोरून येणाºया गाडीने जोरदार धडक दिली असता. बाईक वरील तीन जण गंभीर जखमी झाले. वाहन चालक अतुल भैसारे वय ४० रा.परसोडी त्याना जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या भंडारा येथील मोफत रुग्णवाहिका सेवेने जखमींना ताबडतोब भंडारा जिल्हा सामान्य रुग्णलयामध्ये उपचारासाठी येथे तात्काळ दाखल केले व तीन रुग्णाचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. तरी जिल्हा सेवा समितीच्या वतीने आवाहन करण्यात येत की सर्वांनी ८८८८२६३०३०, ८७९९९१७३८९ या क्रमांकावर कॉल करून रुग्ण वाहिका सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.