महात्मा गांधींविरोधात आपत्तीजनक वक्तव्य केल्याबद्दल काँग्रेसचा तिव्र संताप

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्हा कॉंग्रेस तर्फे मोहन पंचभाई यांच्या नेतृत्वात भिडे गुरुजींचा निषेध करण्यात आला. गांधी चौक येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्या समोर कॉंग्रेस कार्यालयासमोर बडनेरा येथे मनोहर कुलकर्णी म्हणजेच भिडे गुरुजी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल अवमानकारक केलेल्या बेतल वक्तव्याच्या निषेधार्थ भिडे गुरुजी च्या प्रतिमेला जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आले. मनोहर कुलकर्णी या व्यक्तीने प्रथमत: संभाजी महाराजांचे नाव लावू नये व त्यांना कुठलाही अधिकार नाही. या मनोहर कुलकर्णी नावाच्या बिनडोक व्यक्ती वर शासनाने तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा जिल्हा काँग्रेसच्या वतीने याच्या पेक्षाही अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. अमरावतीमधील एका कार्यक्रमात गांधीजींचे वडील हे मुसलमान जमीनदार होते, असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले होते. भिडेंच्या या वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटत राष्ट्रपित्याबद्दल निंदाजनक विधाने केल्यामुळे काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. संभाजी भिडे गुरुजी यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी केली आहे.

महात्मा गांधी यांच्याबद्दल भिडे यांच्या लाजिरवाण्या वक्तव्यामुळे सर्वसामान्य जनमानसांच्या भावना दुखावल्या आहेत. यामुळे राज्यभर त्याचे पडसाद उमटत असून राज्यभरात संभाजी भिडे याचा निषेध करण्यात येत आहे. भिडे वर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अन्यथा कॉंगेस यापेक्षा अधिक आहेत. तीव्र आंदोलन छेडेल असाही इशारा पदाधिकाºयांकडून यावेळी देण्यात आला आहे.भिडे गुरुजी वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा असे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांनी मागणी केली. जनहिता करता आम्ही आंदोलन केल्यास आमच्यावरती गुन्हे दाखल करतात, परंतु राष्ट्रपिताच्या बद्दल नेहमीच बेताल वक्तव्य करणाºया भिडे गुरुजीला मात्र अजून मोकळेच सोडलेले आहे. असा सवाल सुद्धासरकार ला मोहन पंचभाई यांनी विचारले.

यावेळी मोहन पंचभाई, प्रदेश महासचिव जिया पटेल, महिला जिल्हाध्यक्ष जयश्रीताई बोरकर, फिसरी सेल प्रदेश सचिव प्रकाश पचारे, सभापती मदनजि रामटेके, स्वाती वाघाये, माजी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, युवक काँग्रेस अध्यक्ष पवन वंजारी, सोशल मीडिया अध्यक्ष योगेश गायधने, शहर अध्यक्ष प्रशांत देशकर, ओ बी सी सेल जिल्हाध्यक्ष शंकर राऊत, तुमसर शहर अध्यक्ष कान्हा बावनकर, तालुका अध्यक्ष प्यारेलाल वाघमारे, इंटक जिल्हाध्यक्ष धनराज साठवणे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष रिजवान काझी, राजू निर्वान, देवा इलमे, स्वाती हजारे, संगीता नवघरे, मंजुषा चौव्हाण , मनीषा निंबार्ते, कविता उके, विद्या कुंभारे, अनिता भुरे, शिवा गायधने, गायत्री वाघमारे, प्रेम वनवे, राजकपूर राऊत, विनितकुमार देशपांडे, गोलू निर्वान, पवन मस्के, महेंद्र वाहणे, मंगेश हुमणे, स्वाती हेडाऊ, सरिता कापसे, बाळा गभणे, राजेश हटवार, उत्तम भागडकर, अमर रगडे, शमिम शेख, धर्मेंद्र बोरकर, विपीन बोरकर, जीवन भजनकर, पृथ्वी तांडेकर, धर्मेंद्र गणवीर, सचिन फाले, श्रीकांत बांसोड, प्रफुल्ल शेंडे , नरेंद्र साकुरे, बिट्टू सुखदेवे, आकाश ठवकर, कमल साठवणे, सारिका नागदेवे, संगीता नवघरे, सादानंद धारगावे, अनिक जमा, आशिष निखाडे, महमुद खान, नवाब पटेल, जगदीश उके, अस्विनी निखाडे, ममता बिसेन, चंदू भाऊ कावडे, भगवान नवघरे, संजय सार्वे, विजय कापसे, विजय देशकर, प्रमोद मानापुरे, किशोर राऊत, निखिल तिजारे, करुणा धुर्वे, भावना शेंडे, वैशाली उके, व कार्यकर्ते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.