संभाजी भिडे यांना जिल्ह्यात प्रवेश बंदी करा ! भीम आर्मी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : संभाजी भिडे हे २०१८ मधील भिमा कोरेगाव प्रकरणातील मुख्य आरोपी असुन त्यांना भंडारा जिल्ह्यात प्रवेश बंदी घालण्यात यावी तसेच संभाजी भिडे यांना जिल्ह्यात आमंत्रित करणाºया सामाजिक संघटनेवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भीम आर्मी तर्फे भंडारा जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांना दिलेल्या निवेदनातुन करण्यात आली आहे. संभाजी भिडे हे २०१८ च्या भिमा कोरेगाव प्रकरणातील मुख्य आरोपी असुन सदर प्रकरणामुळे संपुर्ण महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण होवुन सामाजिक सलोखा बिघडलेला होता.

२५ जुलै २०२३ रोजी मोहाडी तालुक्यातील मोह- ाडी येथे वरठी शहरातील काही जातियवादी लोकांनी संभाजी भिडे यांना बोलावुन सामाजिक सलोखा बिघडवुन दलित बांधवांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला. संभाजी भिडे यांनी समाज सुधारक महात्मा फुले यांचा अपमान करणारे वक्तव्य केल्याने समाजात मोठया प्रमाणात रोष व्यक्त केला जात आहे.तरी संभाजी भिडे यांना भंडारा जिल्ह्यात प्रवेश बंदी घालण्यात यावी अशी मागणी निवेदनातुन करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी भीम आर्मी जिल्हाध्यक्ष आनंद गजभिये,प्रदीप वासनिक, अक्षय देशभ्रतार,अक्षय शेंडे, कुणाल लोणारे,शुभम भिवगडे, मयुर खोब्रागडे, हर्ष वासनिक , शकिल शेख, अक्षय गजभिये,रोहित डोंगरे,शैलेश वासनिक, अंकित वासनिक,अश्विन शेंडे, सम्यक बोरकर,अजित मराठे, सुरज भालाधरे,प्रशांत सुर्यवंशी तसेच भीम आर्मीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.