सनμलॅग शाळेच्या ३५ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : संपूर्ण जिल्ह्याभर दर्जेदार शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारा रोड, वरठी येथील सनμलॅग शाळेत, शाळेचा ३५ वा स्थापना दिवस मोठया जोमाने आणि उत्साहात करण्यात आला. मंगळवार दि.१आॅगस्ट २०२३ ला या दिवसाचे औचित्य साधून शाळेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात एकल नृत्य, सामूहिक नृत्य, देशभक्तीपर गीत प्रभात फेरी असे विविध कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आले. विशेष म्हणजे पहिल्यांदा शाळेत लोकतांत्रिक पद्धतीने वर्गप्रतिनिधीची निवड करून त्याची घोषणा करण्यात आली. कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक राजीव कुमार सिंग यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आर.वी.दळवी, खोंडे, एचआर प्रमुख सतीश श्रीवास्तव आणि वित्त प्रमुख सुनील झा यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अनेक मान्यवरानी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यात आर.वी. दळवी यांनी दलाई लामा यांच्या मार्गदर्शनाचा दाखला देत यशस्वी होण्यासाठी लक्ष निर्धारित करून त्यासाठी अथक परिश्रम केले पाहिजे असे सांगितले. ज्येष्ठ शिक्षक आर.के पांडे यांनी शाळेच्या वर्तमान व भूतकाळाबद्दल माहिती दिली.

वर्तमानातील शाळेच्या यशस्वी वाटचाल, अभियांत्रिकी, वैद्यकीय, शिक्षण किंवा विज्ञान अशा प्रत्येक क्षेत्रात शाळेतील विद्यार्थी आपला ठसा उमटवत आहेत. शाळा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, कौशल्याभिमुख शिक्षण सुरु करीत आहे. रोबोटिक्स, वैदिक गणित धनुर्विद्या आणि ध्यान आयात याबाबत शिक्षण दिले जात आहेत. शाळेत विज्ञान, वाणिज्य आणि कला हे तीनही प्रवाह आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, शाळा विविध क्लब चालवते.यात विद्यार्थी कलागुणांचे आणि कौशल्यांचे प्रदर्शन करतात. तज्ञ शिक्षकांच्या मदतीने, शाळा आयईओ, आयएमओ, एनएसओ, आयएसओ इत्यादी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परीक्षा घेत असते. सनμलॅग शाळेचे तज्ञ आणि अनुभवी शिक्षक विद्यार्थ्यांना एलआयटी, जेईई, नीट बाबत मूलभूत गोष्टी शिकवत आहेत. शाळेचे प्रिन्सिपल राजीव कुमार सिंग यांच्या नेतृत्वाखाली शाळेची प्रगतीकडे वाटचाल सुरु असून शाळेलायशाच्या शिखरावर पोहोचण्याचा सिंग यांच्या मानस आहे. असेही ज्येष्ठ शिक्षक पांडे यांनी सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.