शेतीच्या वादातुन जबर मारहाण

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे मांडवी येथील शेतीचे वादावरून दोन आरोपींनी एका ईसमास मारहाण केल्याने त्यास गोंदिया केटीएस रुग्णालयात उपचारा करता दाखल केले असून या प्रकरणात तिरोडा पोलीस स्टेशनचे दोन कर्मचाºयांनी हयगय केल्यामुळे पोलीस अधीक्षक यांचे आदेशावरून त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

तिरोडा पोलीस सूत्रांकडून मिळालेले माहितीनुसार मांडवी येथील श्यामकला बेवा इंदल माहुले ६० वर्ष या महिलेने तिरोडा पोलीस स्टेशन येथे दिलेले तक्रारीनुसार २६ जुलै रोजी रात्री १० वाजता दरम्यान दीपक झनकलाल माहुले ३६ वर्ष गीतेस झनकलाल माहुले ३२ वर्ष दोन्ही राहणार मांडवी यांनी २६ जुलै चे रात्री दहा वाजता चे दरम्यान फिर्यादीचे घरासमोर येऊन शिवीगाळ केल्याने फियार्दीचा मुलगा सचिन ईदल माहुले २५ ने घराबाहेर येऊन तुम्ही शिवीगाळ का करता असे म्हटले वरुन आरोपी क्रमांक एक व दोन यांनी संगणमत करून फिर्यादी व जखमीस शिवीगाळ करून आरोपी क्रमांक एक यांनी थापड बुक्क्यांनी मारहाण करून आरोपी क्रमांक दोन याने जखमीचे डावे पायाचे टोंगळ्याखाली लोखंडी सळाखीने मारहाण केल्याने जबर जखमी झाल्या वरून त्यास केटीएस रुग्णालय गोंदिया येथे दाखल केले असून गोंदिया वरून जखमी बाबत तिरोडा पोलीस स्टेशनला संदेश आला असतानाही तसेच पोलीस निरीक्षक यांनी एका कर्मचाºयासं जखमीचे बयान नोंद करून त्याचे वैद्यकीय अहवाल प्राप्त करण्याचे आदेश दिले असतानाही या आदेशाचे योग्य प्रकारे पालन न केल्याने तसेच या दिवशी स्टेशन डायरीवर असलेले कर्मचाºयांनी योग्य प्रकारे गुन्ह्याची नोंद न केल्याने या प्रकरणाची तक्रार पोलीस अधीक्षक गोंदिया यांचे कडे गेल्या वरून कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांचे आदेशावरून तिरोडा पोलीस स्टेशनचे हवालदार राजु वनवे व नीलकंठ रक्क्षे यांनी कर्तव्यात कसूर केल्याने त्यांना निलंबित करून मुख्यालय गोंदिया येथे पाठवण्यात आले असून या प्रकरणी तिरोडा पोलिसांनी फिर्यादीचे तक्रारी वरुन भादवी कलम ३२६,३२४,३२३,५०४,५०६,३४ नुसार गुन्हा नोंद करून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर हनवते यांचे कडे सोपवल्या वरून त्यांनी दोन्ही आरोपींना ३० जुलै रोजी रात्री अटक करून न्यायालयातून पोलीस कोठडी मिळवून आरोपीतांन कडून गुन्ह्यात वापरलेली लोखंडी सळाख जप्त करून आरोपीतांवर पुढील कारवाई करण्याकरता दिनांक आज दिनांक २ आॅगस्ट रोजी न्यायालयात पाठवले आहे

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.