सरपंच पतीची ग्रामविकास अधिकाºयाला जिवे मारण्याची धमकी

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली : भंडारा तालुक्यातील सिल्ली येथील ग्रामपंचायतच्या सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांच्यातील प्रशासकीय मतभेद वाढत असल्यामुळे सरपंचबाईचे पती चंद्रशेखर वासुदेव पडोळे यांची ग्रामपंचायत कारभारात हस्ताक्षेप वाढत असल्याने ग्रामविकास अधिकारी यांच्याप्रती मनात राग ठेवून अश्लील शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी देण्यातपर्यंत सरपंचाच्या पतीची मजल गेली आहे. त्यामुळे ग्रामविकास अधिकारी यांनी सरपंच महोदयाच्या पतीपासून जीवाला धोका असून त्यांचेवर कार्यवाही करण्याची निवेदनाद्वारे जिल्हा पोलीस अधिक्षक व जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मागणी केली आहे.

तालुक्यातील सिल्ली येथील ग्रामपंचायतमध्ये विद्यमान सरपंच व काही सदस्य यांचेत प्रशासकीय कामात अनियमितता असल्यामुळे गावातील विकास कामे होत नसल्याची गावकºयांची ओरड असून ग्रामपंचायत प्रशासन व पदाधिकारी यांचेतील वाद वारंवार चव्हाटयावर येत आहे.सिल्ली येथील ग्रामविकास अधिकारी शामराव अभिमन नागदेवे हे दि. ४ आगस्ट २३ रोजी नियमित प्रमाणे कार्यालयीन काम करीत असतांना दुपारी १ वाजताच्या सुमारास सुधाकर शंकर माकडे सरपंच महोदया च्या कक्षात भेटण्यास जातानी दिसले. अगदी पाच मिनिटात त्याच्यात शाब्दिक बाचाबाची होऊन कार्यालयाच्या बाहेर निघून गेले. त्यानंतर पाच/दहा मिनिटात सरपंच महोदयाचे पती चंद्रशेखर वासुदेव पडोळे यांनी कार्यालयात येऊन ग्रामविकास अधिकारी यांना अश्लील शिवीगाळ करून ‘साले आॅफीस के बाहर निकल, शाम ६ बजे के बाद तू घर कैसे पहुंचता है, देखता हु, असे बोलून जीवानिशी मारण्याची धमकी दिली व मारण्यासाठी ग्रामविकास अधिकारी कक्षाकडे धावले.

मात्र संगणकचालक रुमदेव माकडे यांनी त्यांची कंबर पकडून अडविले व ग्रामपंचायत दिवाबत्ती कर्मचारी पंढरी बावणे यांनी समोर उभे राहून अडविले. त्यामुळे अनर्थ टळला असल्याची तक्रार ग्रामविकास अधिकारी शामराव नागदेवे यांनी दिली आहे. याशिवाय कारधा पोलीस स्टेशन ठाणेदार यांना लगेच फोन करून झालेल्या घटनेची सविस्तर माहिती देऊन सरपंचबाईचे पतीपासून जीवाला धोका असल्याचे सांगितले असून त्यांचेवर शासकीय कामात हस्ताक्षेप व कर्तव्यावर असतांना अश्लील शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी देण्याºया सरपंचबाईच्या पतीवर कार्यवाही करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद भंडारा, जिल्हा पोलीस अधीक्षक, ठाणेदार पोलीस स्टेशन कारधा यांना तक्रार देऊनकार्यवाहीची मागणी ग्रामविकास अधिका- री शामराव नागदेवे यांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.