‘‘माझी माती माझा देश’’ अभियान अंतर्गत साकोली पंचायत समितीत पंचप्रण शपथ कार्यक्रम संपन्न

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : केंद्र शासनाच्या निदेर्शानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त क्रांती दिनी स्थानिक पंचायत समितीच्या सभागृहात पंचप्रण शपथ कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमा प्रसंगी गणेशजी आदे, सभापती, सौ. सरिताताई लालचंद करंजेकर, उपसभापती, मा. पी. व्ही. जाधव गट विकास अधिकारी, के.डी.टेंभरे, ललित खराबे, कटरे, पंचायत समिती साकोली कार्यालयाचे सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत प्रतिज्ञा घेण्यात आली.

आझादी का अमृतमहोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमाअंतर्गत “मेरी माटी मेरा देश” अर्थात “माझी माती माझा देश” अभियान अंतर्गत आज दिनांक ९ आॅगस्ट २०२३ रोजी देशासाठी स्वातंत्र्य व सुरक्षेसाठी बलीदान दिलेल्या विरांना वंदन करून ” भारतास २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करू. गुलामीची मानसिकता मूळापासून नष्ट करु देशाच समृध्द वारशाचा गौरव करु. भारताची एकात्मता बलशाही करु आणि देशाचे संरक्षण करण्याºयांप्रती सन्मान बाळगू. देशाचे नागरीक म्हणून सर्व कर्तव्याचे पालन करु हे पंचप्रण ( शपथ ) घेण्यात आली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.