जिल्ह्यातील ३३ राईस मिल ‘ब्लॅक लिस्टेड’

प्रतिनिधी गोंदिया : निकृष्ट तांदळाचा पुरवठा केल्याप्रकरणी गोंदिया जिल्ह्यातील ३३ राईस मिलर्सला तीन वर्षांकरिता काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केली, तर यापूर्वीदेखील देवरी तालुक्यातील सात राईस मिलर्सला तीन वर्षांकरिता काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. गोंदिया जिल्ह्यात तांदूळ जमा करताना येथील तांदूळ गुणवत्ता अधिकारी तांदळाची गुणवत्ता तपासून तांदूळ गोदामात जमा करतात; परंतु जमा केलेला हा तांदूळ दुसºया जिल्ह्यात गेल्यावर केंद्रीय पथकाच्या तपासणीत मानवास खाण्यास योग्य नसल्याचे तपासात उघड झाले आहे. यामुळे गोंदिया जिल्ह्यात दुसºया टप्प्यात ३३ राईस मिलर्सला तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्यात आले.

यासंदभार्तील पत्र जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी ४ आॅगस्टला दिले आहे. गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतसेच आदिवासी विकास महामंडळाने गोंदिया जिल्ह्यात खरेदी केलेल्या शासकीय धानाची भरडाईकरिता गोंदिया जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील राईस मिलर्सबरोबर करार केला जातो, पण राईस मिलर्सला भरडाईसाठी दिलेल्या धानाची काही राईस मिलर्स भरडाई न करता इतर राज्यांत धानाला जास्त भाव मिळत असल्याने त्या धानाची विक्री करतात. उत्तर प्रदेश राज्यातील तांदूळ विकत घेत गोंदिया जिल्ह्यात सीएमआरच्या नावावर अधिकाºयांच्या संगनमताने जमा करीत असल्याचे पुढे आले आहे. हाच तांदूळ स्वस्त धान्य दुकानात ग्राहकांना देण्यासाठी बाहेर जिल्ह्यात पाठविला जातो. स्वस्त धान्य दुकानात देण्यात येणारा तांदूळ हा खाण्यास योग्य आहे किंवानाही याची जबाबदारी एफसीआयच्या केंद्रीय पथकाची आहे.

केंद्रीय पथक जिल्ह्यातील स्वत: धान्य दुकानांना पुरविण्यात येणाºया किंवा राईस मिलर्सकडून जमा केलेला तांदूळ गोदामात जाऊन पाहणी करतात. गोंदिया जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतही जमा करण्यात आलेल्या तांदळाची गुणवत्ता केंद्रीय पथक तपासणी करीत असताना जिल्ह्यातील तब्बल ३३ राईस मिलर्सनी पाठविलेला तांदूळ निकृष्ट दजार्चे असल्याचे सांगत त्या राईस मिलर्सला तीन वर्षांसाठी काळ्या यादीतटाकले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.