श्री गुरुदेव सेवा मंडळातर्फे आयोजित रक्तदान शिबीरात ५३ रक्तदात्यांनी केले रक्तदान

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिनानिमित्त रक्तदान शिबिर श्री गुरुदेव सेवा मंडळ लाखांदूर च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ९ आॅगस्ट रोजी क्रांतिदिन व जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये एकूण ५३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. भारतीय भूमी ही सातत्याने नवीनतम कर्याकरिता आणि क्रांती करिता विश्वविख्यात आहे. याच भूमीतून खरी क्रांती उदयास आली. म्हणून शेकडो हजारो अशा संख्येतही न बसणाºया क्रांतिवीरांनी आपल्या रक्ताचा थेंब देऊन इथल्या मातीसाठी स्वत:चं संपूर्ण जीवन बलिदान केले. त्या क्रांतिवीरांच्या क्रांतीला स्मरण करण्याकरिता वंदन, करण्याकरिता ९ आॅगस्ट हा क्रांती दिन असतो. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी “उन्नीसो ब्यालीस को, मुझको भी जेल जाना पडा क्रांती हुई बडी जोर की आवाज मुझसे ही चढा” या शब्दांमध्ये त्यांचा क्रांतिकारी असणारा सिंहाचा वाटा अधोरेखित केला आहे. त्यांचे सेवक म्हणून आणि मानवतेच्या विचारांचे कार्यकर्ते म्हणून दरवर्षीप्रमाणे यावर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन गुरुदेव सेवा मंडळ यांनी केले. त्यात बहुसंख्य गुरुदेव उपासक आणि ५३ रक्तदाते यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाची सुरुवात श्री गुरुदेव सेवा मंडळ लाखांदूर च्या वतीने भजनाद्वारे करण्यात आली त्यानंतर क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटक जि. प. सदस्य प्रियंक बोरकर यांच्या हस्ते तर यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य जी. व्ही. दडवे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक रज्जू पठाण, नगरपंचायत गटनेते बबलू नागमोती, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश ब्राह्मणकर, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती देविदास पारधी, कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव श्रीकांत दोनाडकर, प्रा . भारत नखाते, माजी गटनेते रामचंद्र राऊत, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रेय ठाकरे, नगरसेविका सोफिया पठाण नगरसेविका, पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे, गुरुदेव सेवा मंडळचे उपाध्यक्ष गोविंदराव भुरले, अर्चना भोंगाडे यांच्या उपस्थितीत आॅगस्ट क्रांती दिनाचा कार्यक्रम व रक्तदान शिबिराचा कार्यक्रम पार पडला. रक्तदान शिबीरासाठी सामान्य रुग्णालय भंडारा येथील शासकीय रक्तपेढीचे सहकार्य लाभले. यावेळी संचालन कुमारी देवयानी पिलारे यांनी केले. तर प्रास्ताविक गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष रमेश भैया तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रामचंद्र राऊत यांनी मानले

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.