कोसबी जंगल परिसरात नक्षल विरोधी अभियान राबवित असतांना नक्षल साहित्य जप्त

प्रतिनिधी गोंदिया : देवरी तालुक्यातील कोसबी जंगल शिवारात सी-६० कमांडो पथकाने नक्षल विरोधी अभियान अंतर्गत सर्च आॅपरेशन मोहिम राबविली. या दरम्यान नक्षल्यांच्या वापरातील साहित्य पोलीसांच्या हाती लागले आहेत. यामुळे गोंदिया जिल्ह्यात नक्षलवादी सक्रीय असल्याची बाब समोर आली आहे. जिल्ह्याचे नवे पोलीस अधिक्षक विश्वा पानसरे यांनी जिल्ह्याचा कारभार हाती घेताच नक्षल्यांचा बिमोड करण्याच्या उद्येशाने नक्षल शोध मोहिम राबविण्याचे आदेश दिले. या वरून २२ सप्टेंबर रोजी अप्पर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. अतुल तावाडे, सपोनि. कमलेश पच्छाव यांच्या नेतृत्वात सी- ६० पथकाच्या जवानांनी कोसबी जंगल शिवारात सर्च आॅपरेशन राबविले. या दरम्यान नक्षल्यांकडून दैनंदिन वापरल्या जाणाºया वस्तुची साठवणूक शोधण्यास यश आले आहे. साठवणूक क्षेत्राची तपासणी केली असता त्या ठिकाणी पाच काळ्या रंगाचे ताडपत्र्या मिळून आल्या. सदर ताडपत्र्यांचा उपयोग नक्षलवादी जंगलात राहण्याकरिता करत असल्याचे समजून आले. सी – ६० जवानाच्या पथकाला हाती लागलेल्या साहित्यावरुन जिल्ह्यात नक्षल सक्रीय असल्याची बाब समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *