लाचखोर कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

प्रतिनिधी गोंदिया : वीज चोरी करीत आहात, तुमच्यावर कारवाई करून १ लाख रुपयांचा दंड आकरणी होउ शकते. असा दम भरून ७ हजार रुपयांची लाच मागणाºया महावितरण कंपनीच्या वरिष्ठ तंत्रज्ञ कर्मचाºयाला रंगेहात अटक करण्यात आले आहे. लाचखोर कर्मचाºयाचे नाव सुनिल गोमन रहांगडाले ३७ वर्ष असे आहे. तक्रारकर्त्याच्या राहत्याघरी आरो वॉ- टर प्लांट आहे. याकरिता त्याने वेगळा विद्युत मीटर घेतला आहे. एप्रिल २०२० दरम्यान आरो प्लांटच्या कॉम्प्रेसर मध्ये काही तांत्रिक बिघाड आल्याने कुलिंग कालावधी वाढली. त्यामुळे वीज खर्च जास्त होउ लागला, वीज बिल जास्त येउ नये म्हणून मिटरमधून कनेक्शन घेतले होते. वरिष्ठ तंत्रज्ञ सुनिल गोमन रहांगडाले हा १२ सप्टेंबर रोजी आरो प्लांटमध्ये मिटर तपासणीसाठी आला होता.

दरम्यान मिटरमध्ये डायरेक्ट वायर लावल्याचे दिसून आल्याने वीज चोरी करीत असल्याचा आरोप केला. चोरी प्रकरणात १ लाख रुपयाची दंड आकारणी होउ शकते, असे सांगून तक्रारकर्त्याला दम भरले. दरम्यान कारवाई न करण्याच्या नावाखाली त्यानी ७ हजार रुपयांची लाच मागितली. मात्र तक्रारकर्त्याला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत विभाग गोंदियाकडे तक्रार नोंदवि ली. तक्रारीची सहनिशा केली असता, आरोपी रहांगडाले लाच मागीत असल्याचे समजून आले. यावरून २२ सप्टेंबर रोजी सापडा रचण्यात आला. दरम्यान आरोपी सुनिल रहांगडाले याला तक्रारकर्त्याकडून ६ हजार रुपयांची लाच स्वीकारतांना रंगेहात पकडण्यात आले. त्यावरून आरोपी विरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत नवेगावबांध पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *