चारा आणण्यासाठी गेलेले तीन तरुण पाण्यात गेले वाहून

प्रतिनिधी गोंदिया : जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील धोबीसराड नाला येथील गुरांसाठी चारा आणायला गेलेली पाच मुले नाल्याच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना आज सकाळी घडली. गावालगत असलेल्या नाल्यानजिक गावातील पाच तरुण गाईचा चारा आणण्याकरिता गेले होते. तर चारा हा नाल्यापलीकडे असल्यामुळे नाला पार करण्याचा प्रयत्न या पाचही युवकांनी केला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे हे युवक नाल्यातील पाण्यात वाहू लागले. या तरुणांचा आरडाओरडा ऐकून जवळच असलेल्या काही युवकांनी नाल्यात पोहत जाउन या पाचपैकी दोघांना बचावले तर पाण्याचा वेग जास्त असल्याने इतर तीन युवक यात वाहून गेले. यातील २ मूलांना सुखरूप वाचविण्यात आले असून ३ मुलांचे शोधकार्य सुरू आहे. नाल्यात वाहून जाणाºया पाचपैकी दोघांना वाचविण्यात आले. आदित्य गौतम (१५ वर्ष) व राहुल पटले (वय १८) अशी बचावलेल्या मुलांची नावे आहेत. तर जी मुले नाल्याच्या पाण्यात वाहून गेली आहेत त्यामध्ये सावन पसीताराम पटले (२२ वर्ष), अतुल माणिकचंद ठाकुर (१५ वर्ष) व संदीप सोमराज कटरे (२२ वर्ष) अशी बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत. शोध पथकाव्दारे तिघांचा शोध सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *