लोकसहभागातून शोषखड्डे निर्मिती श्रमदान अभियानाचा शुभारंभ

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : पाचशे लोकसंख्येपेक्षा कमी असलेल्या गावांमध्ये लोकसहभागातून सार्वजनिक ठिकाणी शोषखड्डे निर्मिती श्रमदानाचा अभियानाचा शुक्रवारी (११ आॅगस्ट २०२३) ला भंडारा पंचायत समिती अंतर्गत संगम पूनर्वसन येथे शुभारंभ करण्यात आला. अधिकारी, लोकप्रतिनिधी, मुख्याध्यापक, ग्राम पंचायत पदाधिकारी, नागरिकांच्या वतीने बोअरवेलच्या पूढे शोषखड्डा निर्मितीकरीता श्रमदान करण्यात आले. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) एम.एस. चव्हाण, गट विकास अधिकारी संघमित्रा कोल्हे, सरपंच शारदा मेश्राम, माजी पं. स. सभापती नरेंद्र झंझाड, पंचायत समिती सदस्य संजय बोंदरे, विस्तार अधिकारी (पं.) आर.एम. धांदे, जिल्हा कक्षाचे अजय गजापूरे, राजेश येरणे, ग्रामसेवक गजभिये, उपसरपंच जिजा सार्वे, ग्राम पंचायत सदस्या रागिना मेश्राम, अंगणवाडी सेविका अर्चना सार्वे, गट समन्वयक नागसेन मेश्राम, समुह समन्वयक स्मृती सुखदेवे यांची उपस्थिती होती. मुख्य कार्यकारी अधिकारी समिर कुर्तकोटी यांचे मार्गदर्शनात जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

या माध्यमातून गावस्तरावर घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रक्रिया राबविल्या जात आहे. पाचशे लोकसंख्येपेक्षा कमी असलेल्या जिल्ह्यातील १२५ गावांचे घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचे आराखडे तयार करण्यात आले असून लवकरच अंमलबजावणी प्रारंभ होणार आहे. आदी सर्व गावांमध्ये लोकसहभागातून प्रति गाव एक सार्वजनिक शोषखड्डा तयार करण्याकरीता हा श्रमदान अभियान राबविण्यात येत आहे. गावात घनकचरा व सांडपाणी प्रकल्पाची अंमलबजावणी केल्यानंतर गाव ओडिएफ प्लस म्हणून घोषीत करण्याची प्रक्रीया पार पाडली जाईल. वापरातील पाण्यामुळे स्त्रोतासभोवती सांडपाणी निर्माण होते. सांडपाण्यामुळे μलेटफार्म तुटण्यासोबतच पाईप गंजण्याचा धोका असतो. शिवाय आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका असतो. स्त्रोतासभोवती निर्माण होणाºया सांडपाणीव्यवस्थापनातून जलपूनर्भरण करता येणे शक्य असल्याने शोषखड्डे निर्मितीचा उपक्रम गावांना फायदेशीर ठरणारा आहे, अशी माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) एम.एस. चव्हाण यांनी दिली. सध्या प्रत्येक गावात घनकचरा व सांडपाणी समस्या उभी ठाकली आहे. त्यामुळे सांडपाण्याचे व्यवस्थापन होणे अत्यावश्यक आहे. घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन लोकसहभागातून झाल्यास गाव स्वच्छ व सुंदर करता येईल, याकरीता नागरिकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी एम.एस. चव्हाण यांनी केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.