सगणक परिचालकाच्या मत्यस जबाबदार व्यक्तीवर कारवाइ करा

लाखनी :- तुटपुंज्या मानधनावर काम करणाºया ग्रामपंचायत संगणक परिचालकास तालुका स्तरावर १००२०० एंट्र्या झाल्या नाही तर कामावरून काढून टाकण्याची व्हॉट्सअ‍ॅप वरून धमकी देणे, अधिकचे काम करवून घेणे, प्रामाणिक काम करणाºयास काढून नवीन परिचालक निवड करणे या प्रकाराला कंटाळून जिल्हा नांदेड बिलोली तालुक्यातील हिप्परगाथडी ग्रामपंचायतीचे संगणक परिचालक अंबादास पेटेकर यांनी ग्रामपंचायत कार्यालयात आत्महत्या केली. यास जबाबदार असणाºयावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. या करिता लाखनी तालुका संगणक परिचालक संघटनेच्या वतीने सोमवारी(ता.१४) लाखनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. ग्रामविकास विभागामार्फत प्रत्येक ग्रामपंचायतीत आपले सरकार सेवा केंद्र मागील १४ वर्षापासून सुरू असून एस.पी. कंपनी चे वतीने संगणक परीचालकाची निवड करण्यात येते. मागील १४ वषार्पासून ६ हजार ९३० रुपये ह्या तुटपुंज्या मानधनावर संगणक परिचालक कार्यरत असून त्यांचेकडून आॅनलाईन व आॅफलाईन काम करवून घेण्यात येते. मानधनही चार-चार महिने मिळत नाही.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.