साकोलीत आॅनलाईन जुगारामुळे अनेकांचे घर उध्वस्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग असुन या युगात मोबाईल ही जिवनावश्यक गरज बनली आहे. आजची तरुणाई तर मोबाईलच्या इतक्या आहारी गेली आहे की या तरुणांना मोबाईलचे व्यसनच जडले आहे. आज प्रत्येक तरुणाकडे स्मार्ट फोन आहे. व ह्या स्मार्ट फोन मध्ये इंटरनेटवर चालणारे अनेक प्रकारचे गेम असतात या गेमने तरुणांना अक्षरश: वेड लावले आहे. जंगली रमी, रिअल रमी, रमी पॅशन, रमी क्लब, तीन पत्ती असे अनेक पैशावर खेळवणारे गेम इंटरनेटवर धुमाकुळ घालत आहेत.त्याच प्रकारे मोबाईल वर खेळणारा आॅनलाईन गेम जुगार ‘फन टारगेट’ हा देखील त्यापैकीच एक गेम आहे. इंटरनेटवर चालणाºया या आॅनलाईन फन टारगेट गेमच्या विळख्यात तरुणाई अडकली आहे.या आॅनलाईन जुगार खेळण्याचे वेड तरुण पिढीला आर्थिक नुकसान करणारे ठरत आहे. मोबाईलवर खेळला. जाणारा हा गेम म्हणजे एक प्रकारचा जुगारच आहे. हातात असलेल्या मोबाईलवर आॅनलाईन रमी खेळण्याचे अनेक अ‍ॅप्लीकेशन उपलब्ध आहेत.

घरी, शेतात, नौकरीच्या व व्यवसायाच्या ठिकाणी अनेक जन एकत्र येऊन आॅनलाईन फन टारगेट ,रमी खेळतांना दिसत आहेत. अशा प्रकारे आॅनलाईन जुगार खेळायला लावणºया अ‍ॅप्लीकेशनच्या जाहिरातील अनेक सिलेब्रिटी दिसून येत आहेत. तसेच सोशल मिडियावर संबंधीत जाहिराती दाखवल्या जातात त्या जाहिराती पाहून तरुणाई या गेमकडे आकर्षीत होत आहेत. या आॅनलाईन जुगारामुळे तरुणांना आर्थिक नुकसानिस सामोरे जावे लागत आहे. आॅनलाईन जुगार गेमच्या नादाला लागून अनेकजन कंगाल झाले आहेत. आॅनलाईन फन टारगेट गेम मुळे अनेकांचे संसार कुटूंब उध्दवस्त होत आहेत अनेक घरे उध्दवस्त होत आहेत व अनेकांनी वेगवेगळ्या प्रांतात आत्महत्या सुध्दा केल्या आहेत. आपल्या पाल्यांना यातुन बाहेर काढण्यासाठी काहींनी तर घर व शेत विकले आहेत. सहज पैसे कमविण्याचे अमिश दाखवुन लोकांच्या घामाचे व कष्ठाचे पैसे सर्रास लूटले जात आहे तसेच हिंसाचार व गुन्हेगारी वाढत आहे. दक्षिणेकडच्या राज्यांनी आॅनलाईन गेमवर बंदी घातली आहे.

कर्नाटक सरकारने तसा कायदाच केला आहे. केरळ, आंध्रप्रदेश आणि तेलंगाना मध्ये ही आॅनलाईन रमीवर बंदी आहे. महाराष्ट्रात मात्र अजुन ही या गेमवर बंदी नाही राज्यातील तरुणांना आॅनलाईन फन टारगेट,रमी या जुगारातून वाचवायचे असेल तर महाराष्ट्र सरकारने तसेच राज्य लॉटरी संचालनालयाने आॅनलाईन जुगार वर बंदी आणायला हवी. किंवा बंदी घालण्यासाठी कायदयाने कशी तरतुद करता येईल हे बघणे आज रोजी जिकरीचे झाले आहे. आॅनलाइन लॉटरीच्या दुष्परिणामांविषयी नागरिकांमध्ये जाणीव जागृती निर्माण होण्यासाठी व्यापक स्तरावर मोहीम राबविण्यात येईल. अवैध आॅनलाइन लॉटरीच्या प्रतिबंधासाठी कायद्यात संशोधन करून त्यांना कायद्याच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या अधिवेशनात विधानसभेत सांगितल्याने त्यांच्याच पालकमंत्री असलेले साकोलीत आॅनलाईन जुगार सुरू असल्याने पोलिस प्रशासन कारवाई करेल काय? मा. पोलिस अधीक्षक मतानी साहेब साकोली मधे सुरु असलेल्या या आॅनलाइन फन टारगेट जुगार बंद करुन बुकी वर कारवाई करतील का? या कड़े तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. एखाद्याने या विषयी तक्रार केली तर त्यालाच उलट्या चौकशीला सामोरे जावे लागत असल्याने सर्वसामाण्य नागरीक या विषयापासुन चार हात लांब राहणेच पसंद करत आहेत. या झंजाटात पडायलाच नको असे म्हणून कित्येकजण गप्प बसने पसंत करत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.