रूग्णाला त्रास होणार नाही याची दक्षता आरोग्य प्रशासनाने घ्यावी : आरोग्यमंत्री राजेश टोपे

प्रतिनिधी गोंदिया : आज जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे खासदार प्रफुल पटेल, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृहमंत्री व गोंदिया जिल्हाचे पालकमंत्री अनिल देशमुख यांनी जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाबाबद संबंधीत विभागाचे अधिकाºयांसोबत कोरोना विषाणु प्रादुर्भाव संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता गोंदिया येथे प्लाज्मा लॅब व दुसरी RTPCR मशीन लवकर उपलब्ध करून त्वरित सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. लिकवीड आक्सीजन टैंक त्वरीत लावण्या बाबत पालकमंत्री यांनी मंजुरी दिली. खासगी रूग्णालयात सरकारी माणसाची नेमणूक करावी आणि शासकीय नियमानुसार रूग्णांवर शुल्क आकारले जावे, सरका- रच्या निर्धारित दरापेक्षा सीटी स्कॅन आणि प्लाज्मा थेरपीचा अधिक शुल्क आकारणीवर कारवाही केली जावी असे ना. राजेश टोपे म्हणाले.

खा. पटेल यांनी पालकमंत्री देशमुख यांच्याकडे लक्ष वेधून आॅक्सिजन सिलिंडरच्या काळ्या बाजाराची दखल घेत त्यांनी असे कृत्य करणाºयावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याबद्दल सांगितले. पटेल यांनी बैठकीत कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या रूग्णांना उत्तम भोजन देण्याच्या विषयावर भर दिला. प्रसूती करिता नवीन वॉर्ड, व्हेंटिलेटर, आॅक्सिजन सपोर्ट बेड या सूविधा अद्ययावत करण्यासोबतच पॉझिटीव्ह रूग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व तपासण्या वाढविण्याच्या सुचना खासदार प्रफुल पटेल यांनी दिल्या. यामुळे पॉझिटीव्ह रूग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे. कोविड-१९ च्या उपचारासाठी लागणारे डॉक्टर, नर्स व वार्डबॉय यांची नियमित भरती करण्याचे सर्व अधिकार देऊन लवकर पद भरती करण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाºयांना दिले. सामान्य रूग्णाला त्रास होणार नाही याची दक्षता आरोग्य प्रशासनाने घ्यावी असे सांगूण आरोग्यमंत्री म्हणाले की, जिल्हयातील ग्रामीण रूग्णालयात आॅक्सिजन सपोर्ट बेड तयार करण्यात यावेत. जास्तीत जास्त चाचण्या करण्यावर भर देण्यात यावा तसेच २४ तासात कोरोनाचा अहवाल प्राप्त झाला पाहिजे असे निर्देश देण्यात आले.

कोरोनामुक्त महाराष्ट्रासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम अतिशय उपयुक्त असून या मोहिमेद्वारे मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी असे त्यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कडून मंत्री महोदयांना निवेदन देण्यात आले. आढावा बैठकीत जिल्हाधिकारी दीपककुमार मीना, पोलीस अधीक्षक विश्वा पानसरे, अधिष्ठाता डॉक्टर तिरपुडे, जिल्हा शल्य चिकिसक रामटेके, जिल्हा आरोग्य अधिकारी निमगडे, मुख्य अधिकारी खवळे, संचालिका श्रीमती अर्चना पाटील (आरोग्य विभाग,पुणे), आमदार मनोहर चंद्रिकापुरे, आमदार राजू कारेमोरे, माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार सेहशराम कोरोटे, माजी खासदार खुशाल बोपचे, रा. का. जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन, देवेंद्रनाथ चौबे व अन्य अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *