तब्बल ३०४ रुग्ण झाले कोरोनामुक्त : नवे ३०५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

प्रतिनिधी गोंदिया : जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण औषधोपचारातून बरे होण्याची संख्या साडेतीन हजाराच्या वर पोहोचली आहे. आज उपचार घेत असलेल्या ३०४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यातील ३५३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. नव्याने ३०५ कोरोना बाधित रुग्ण आज आढळून आले आहे. तर उपचारादरम्यान तीन रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आज जे ३०५ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे.

गोंदिया तालुक्यात सर्वाधिक १८९ रुग्ण आढळले आहे. यामध्ये गोंदिया शहरातील शारदानगर येथील दोन, सेल टॅक्स कॉलनी येथील दोन, गोंदिया शहरातील इतर भागातील १५, मामा चौक येथील सहा, काटी येथील सहा, बद्रीप्रसाद वार्ड येथील एक, कोल्हारगाव येथील एक, सिव्हिल लाईन येथील दहा, विजयनगर येथील एक, दुर्गा चौक येथील एक, देशबंधू वार्डातील दोन, गुरुनानक वार्डातील चार, महावीर कॉलनी येथील तीन, कटंगीकला येथील दहा, सिंधी कॉलनी येथील सहा, छोटा गोंदिया येथील तीन,पाल चौक येथील एक, मनोहरभाई वार्ड येथील दोन, मरारटोली येथील सहा,गांधी वार्ड येथील एक, सूर्यटोला येथील एक, बाजपेयी येथील एक,चंद्रशेखर वॉर्ड येथील दोन, हरीकाशीनगर येथील तीन, गोविंदपुर येथील बारा,भीमनगर येथील चार,सिंगलटोली येथील एक, श्रीनगर येथील चार,कुंभारटोली येथील चार,

रविशंकर वार्ड येथील एक, माताटोली येथील दोन, हनुमान नगर येथील एक, सावराटोली येथील एक, गणेशनगर येथील चार, सावली येथील एक, शास्त्री वाडार्तील सात, संजयनगर येथील एक, रेलटोली येथील दोन, कुडवा येथील चार, अयोध्यानगर येथील एक, नागरा येथील एक, टिबीटोली येथील एक, फुलचूर येथील सात,कामठा येथील तीन, वर्धमान वाडार्तील तीन,चांदणीटोला येथील एक, रामनगर येथील एक, न्यू लक्ष्मीनगर येथील दोन, पुनाटोली येथील एक, गजानन कॉलनी येथील सात, तांडा येथील दहा ,पंचायत समिती कॉलनी येथील एक,मेन रोड गोंदिया येथील दोन, रिंग रोडवरील तीन,इसरका मार्केट येथील दोन,गंज वाडार्तील एक, रतनारा येथील एक, राजेंद्र वाडार्तील एक, धापेवाडा येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *