जिल्हा मराठी पत्रकार संघात ध्वजारोहन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा: स्वातंत्र्यदिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा मराठी पत्रकार संघ भंडारा येथे जेष्ठ पत्रकार तथा सेवानिवृत्त प्राध्यापक वामनराव तुरीले यांच्या हस्ते व अध्यक्षतेखाली ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सचिव मिलींद हळवे, कोषाध्यक्ष डि.एफ. कोचे, कॉम्रेड हिवराज उके, नितीन कारेमोरे, विलास सुदामे, राजेश आगलावे, चंद्रकांत श्रीकोंडवार, सुरेश कोटगले, विजय क्षीरसागर, दिपक रोहनकर, प्रमोद गभणे, अजय मेश्राम, विलास केजरकर, सागर बागडे, जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाचे सेवानिवृत्त कर्मचारी खडसे, श्रीकृष्ण बावनकुळे, येनोरकर, शरवर शेख यांच्या सह वृत्तपत्र, इलेक्ट्रानिक्स मिडीया तसेच सोशल मिडीयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.