मंदिर/आश्रम बांधकामासाठी दि भंडारा महिला नागरी सहकारी पतसंस्थेची साडे अकरा हजाराची आर्थिक मदत

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : तालुक्यातील निखिल चेतना केंद्र आश्रम करचखेडा येथे मंदिराचे काम सुरु असून या मंदिराच्या बांधकामासाठी दि भंडारा महिला नागरी पतसंस्था मर्या. भंडारा यांच्या वतीने ११ हजार ५०० रुपयाची आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. दुर्गाताई उद्धव डोरले यांच्या हस्ते निखिल चेतना केंद्र भंडाराचे अध्यक्ष दिलीप पांडुरंग ठाकरे व राकेश कुथे यांना धनादेश देण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.