शेतकºयांना तात्काळ धानाचे चुकारे द्या

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : लाखांदूर तालुक्यातील अनेक शेतकºयांना दोन महिने लोटूनही धानाचे चुकारे न मिळाल्याने शेतकºयांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेतकºयांची आर्थिक स्थिती खूप ढासळली आहे. १५ जून पासून एकही शेतकºयाच्या खात्यात पैसे जमा न झाल्याने शासनावर शेतकºयांनी रोष व्यक्त केला आहे. लवकरात लवकर पैसे न मिळाल्यास आंदोलन करण्याचा ईशारा शेतकºयांनी दिला आहे. त्यामुळे तात्काळ शेतकºयांनाधानाचे चुकारे देण्याची मागणी आज १८ आगस्ट रोजी लाखांदूर नायब तहसीलदार अखिलभारत मेश्राम यांच्यामार्फत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भडारा जिल्हा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनातून केली आहे. निवेदन देतेवेळी माजी सरपंच मोहन सोनकुसरे, रमेश पारधी माणिक येरणे, संजय लोणारे, खेमराज मेश्राम, प्रल्हाद हजारे, शेषराव बोरकर, नरेश सोनटक्के गुलशन येरणे, मंगला शहारे, झकास फुल्लूके, राजू बोकडे, गोविंदा येरणे, आकाश येरणे, अरुण ठाकरे, भोजराज देशमुख, मनोज बुराडे विनायक हटवार यांच्या सह अन्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.