मोठया उद्योजकाच पाय वळल गोदियाकड

भंडारा पत्रिका/ प्रतिनिधी गोंदिया:- गोंदिया जिल्हा धान पिकासाठी प्रसिद्ध जिल्हा अशी संपूर्ण महाराष्ट्र सह भारतात देखील ओळख असुन जिल्ह्यात मुख्यत्व धान पीक मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते. परंतु या धान पिकावर अवलंबून असणा?्या मोठ्या उद्योग नसल्याची खंत जिल्ह्याला होती आणि हीच बाब लक्षात घेऊन प्रफुल पटेल हे नेहमीच उद्योजकांना गोंदियात घेऊन येत असतात त्यातच एका उद्योगपतीने गोंदिया जिल्ह्यात धान पिकावर प्रक्रिया करून उरणारा कोंडा त्यापासून तेल बनवण्याचा प्रकल्प गोंदिया जिल्ह्यात उभारला असून त्यामुळे अनेक परिसरातील नागरिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. गोंदिया जिल्ह्यात धान पिक मोठ्या प्रमाणात होते, परंतु धान पिका वर अवलंबून उद्योग जिल्ह्यामध्ये स्थापन झाले नव्हते. हीच बाब लक्षात घेऊन अनेक उद्योगपती आता हळूहळू त्यांचे पाय गोंदियाकडे वळूउ लागलेले आहेत.

सिद्धिविनायक ग्रुप द्वारा धान पासून तांदूळ बनवण्याच्या नंतर उरलेला जो कोंडा असतो त्या कोंड्यापासून तेल बनवण्याचा आणि आॅइल बनवण्याच्या तसेच गुराढोरांकरता आवश्यक खाद्यसमुग्री निर्माण करण्याकरिता एक मोठा कारखाना गोंदिया शहरात जवळील रजेगाव या गावी लावला आला आहे. या उद्योगामुळे परिसरातील जवळपास तीनशे नागरिकांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध होणार आहे. याचे नुकतेच शुभारंभ प्रफुल पटेल राष्ट्रवादीचे नेते यांच्या पत्नी वर्षा पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे आता हळूहळू मोठमोठे उद्योजक आता गोंदियाकडे वळतील असे अपेक्षा आता नागरिक करत आहेत. या वेळी सौ.वषार्ताई पटेल, माजी आमदार श्री राजेंद्र जैन, श्री रवीनंदन गोयल, श्री जनकराज गुप्ता यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.यावेळी सर्वश्री पुरूषोत्तम गोयल, अरूण गोयल, देवेंद्रनाथ चौबे, अनिल गुप्ता, संजीव गोयल, विजय गुप्ता, नरेश अग्रवाल, अतुल गुप्ता, दिनेश अग्रवाल, केतन तूरकर, सचिन शेंडे, नानू मुदलीयार, राजू एन जैन, गोविंद तुरकर, अशोक अग्रवाल, रवि मुंदडा, लवली होरा, लखन बहेलीया, कैलाश अग्रवाल जिम्मी गुप्ता नागरिक उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.