जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसह १२० डॉक्टरांचे राजीनामा

यवतमाळ : जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाºयांनी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांच्या विरोधात पुकारलेल्या आंदोलनास मोठ्यासंख्येने अधिकारी, कर्मचाºयांचा पाठींबा मिळत असल्याने हे आंदोलन तीव्र झाल्याचे दिसत आहे. आज मंगळवारी जिल्हा आरोग्य अधिकाºयांसह तब्बल १२० वैद्यकीय अधिकाºयांनी आपल्या सेवेचा राजीनामा मुख्य कार्यकारी अधिकाºयांडे सुपूर्द केल्याने खळबळ उडाली. करोना काळात गेल्या सहा महिन्यांपासून अविरत आरोग्य सेवा देणाºया जिल्ह्यातील आरोग्य अधिकाºयांना जिल्हाधिकारी सन्मानाची वागणूक देत नसल्याचा आरोप करत सुरू झालेल्या या आंदोलनात विविध अधिकाºयांनी उडी घेतली आहे. जिल्हाधिकारी सिंह हे अधिकारी, कर्मचाºयांना कायमच हीन दर्जाची वागणूक देत असल्याचा आरोप राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेने केला आहे. त्यामुळे त्यांची बदली केल्याशिवाय या आंदोलनातून माघार नाही, असा पवित्रा राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट-अ (मॅग्मो) संघटनेने घेतला आहे.

संघटनेच्यावतीने आज (मंगळवार) येथील आझाद मैदानातील जयस्तंभासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. याशिवाय जिल्ह्यातील १२० आरोग्य अधिकाºयांनी जिल्हाधिकाºयांच्या कार्यशैलीस कंटाळून प्रशासनाकडे राजीनामे सादर केल्याचे डॉ. आकोलकर यांनी सांगितले. या आंदोलनाची दखल घेत विभागीय आयुक्तांनी मंगळवारी रात्री शिष्टमंडळास चर्चेसाठी बोलावले असून जिल्हाधिका- री सिंह यांची येथून बदली केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट-अ (मॅग्मो) संघटनेने जाहीर केली आहे. जिल्हाधिकाºयांची बदली केली नाही तर राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा मॅग्मो संघटनेने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *