सुनिल केदार यांचे हस्ते आज ह्यहॉकर्स प्लाझाह्णचे लोकार्पण

प्रतिनिधी वर्धा : फेरीवाल्यांना आपल्या वस्तूची विक्री करण्यासाठी हक्काची जागा मिळावी व फेरीवाल्यांनी शहरात अतिक्रमन करु नये यासाठी सेवाग्राम विकास आराखडया अंतर्गत हॉकर्स प्लाझाची उभारणी केली आहे. या हाकर्स प्लाझाचे उद्घाटन आज राज्याचे पशुसंव र्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुनिल केदार यांचे हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, जिल्हा पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल कोरडे, तहसिलदार प्रिती डूडूलकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गजानन टाके यांची उपस्थिती होती. हाकर्स प्लाझा मध्ये बांधण्यात आलेले गाळे फेरीवाल्यांना तसेच बचत गटांना बचत गटाचा उत्पादित माल विक्री करण्यासाठी देण्यात येणार आहे. यामूळे फेरीवाले व बचत गटांना हक्काचे दुकान मिळणार आहे. या हॉकर्स प्लाझाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ना.केदार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *