१५ आॅक्टोबरपासून शाळा उघडणार

प्रतिनिधी नवी दिल्ली: देशातील विविध राज्यांमध्ये १५ आॅक्टोबरपासून शाळा उघडणार असून केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने त्यासंदर्भातल्या गाइडलाइन्स लागू केल्या आहेत. १५ आॅक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने देशातील शाळा सुरु होणार आहेत. आधी मोठ्या वर्गाच्या आणि मग हळूहळू लहान वर्गांच्या शाळा सुरु करण्यात येतील. शाळा सुरु करण्याबाबतची मानक कार्यप्रणाली (रडढ) हे राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी ठरवायचं आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळणं आणि शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सु- रक्षेची आणि आरोग्याची काळजी घेणं ही राज्यांची शाळांची जबाबदारी आहे असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. शाळा सुरु करण्याचा निर्णय झाला असला तरीही हा निर्णय सक्तीचा नाही. राज्यातील परिस्थितीनुसार राज्यं याबाबत निर्णय घेऊ शकतात. शाळा सुरु झाल्यानंतर किमान २ ते ३ आठवडे मुलांना गृहपाठ देऊ नये. मुलांचे मन:स्वास्थ योग्य राहिल याची काळजी घेण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. तसंच शाळांनाही स्वच्छता आणि कोविड सुरक्षा नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे असेही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *