चिमुकल्यांचे खाऊचे पैसे रामाच्या चरणी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : शहरातील जीर्णोद्धार होत असलेल्या राम मंदिरासाठी मदतीचा हात पुढे करणारा अर्जुन आणि आराध्या भावंड सगळ्यांच्या कौतुकाचा विषय ठरले आहेत. घ्यायला सगळेच तयार असतात, मात्र देताना अनेकांचे हात आपसूकच मागे ओढले जातात. आपल्या जवळ आहे, त्यातून देण्याची सवय हेच खरे दातृत्व. घरचे संस्कार आणि वातावरणातून या गोष्टी रूजतात आणि त्या आयुष्यभर सोबत असतात. खरंतर आठ दहा वषार्चा वय म्हणजे मी आणि माझे एवढाच विचार करण्याच.पण याही वयात दातृत्व समजलेल्या अर्जुन आणि आराध्या अजित आस्वले या चिमुकल्यांनी एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला. खाऊचे पैसे साठवलेले गुल्लक घेऊन आले आणि मंदिर समितीच्या पदाधिका-यांकडे ते सोपविले. अगदी नि:स्वार्थ भावनेतून खाऊसाठी पदरी पडलेले दान मंदिर समितीच्या पदाधिका-यांकडे सोपवताना त्याची मुलांच्या चेह-यावरील निरागस भावआणि प्रभू श्रीरामाच्या कायार्साठी आपला हातभार लागत असल्याचे समाधान स्पष्ट जाणवत होते. चिमुकल्यांच्या गुल्लक मधून ३११३१ रुपये राम कार्यास अर्पित झाले. माजी आमदार स्व. राम आस्वले यांच्या नातवंडांनी दाखविलेले हे दातृत्व संस्कारक्षम कुटुंबाची खात्री देणारे होते. राम मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष व्दारका सारडा, सचिव मधुकर चेपे यांनी हा निधी तेवढयाच आदरभावाने स्विकारला. यावेळी शिवा चेपे, अजित आस्वले, शिल्पा आस्वले, रिया आस्वले उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.