महिलाविषयक जनजागृती शिबिर

प्रतिनिधी वर्धा : शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या माहिलांच्या योजना व महिला विषयी असलेल्या कायदयांची माहिती महिलांना व्हावी यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने काचनूर येथे महिला जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधी सेवा प्राधिकरणचे सचिव निशांत परमा, अधिवक्ता वर्षा भोयर, चेतना विकास संस्थेच्या रेखा झिल्पे, खरांगनाचे पोलिस उपनिरिक्षक हुसेन शहा, सरपंच सविता अंबुलकर, उपसरपंच शुभम तिवारी, सचिव आर.राठोड, सदस्य दिनेश वाकेकर यांची उपस्थिती होती. यावेळी वर्षा भोयर यांनी महिलांचे कायदे या विषयावर तसेच हुसेन शहा यांनी महिलांबाबत गुन्हेगारी स्वरुप या विषयावर तर निशांत परमा यांनी महिलांना त्यांचा अधिकार मिळवून देण्याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार ग्रामविकास अधिकारी राठोड यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *