नागपूरसह पाच शहरांत सीबीआयचे छापे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : एका शाळेच्या निविदेसाठी १९.९६ लाखांची लाच घेतल्या प्रकरणी केंद्रीय अन्वेशन विभागाने (सीबीआय) नागपूरसह देशातील सहा शहरात छापेमारी केली. या छाप्यात एका खासगी कंपनीच्या मालकासह ७ जणांना अटक केली. यामध्ये खासगी कंपनीच्या मालकासह ब्रीज अँड रुफ कंपनी (इंडिया) लिमीटेडचे मुख्य कार्यकारी संचालकांचा कार्यकारी सचिव आशिष राजदान याचाही समावेश आहे. अन्य आरोपींमध्येएच.पी. राज्यगुरु (राजकोट) कंपनीचे मालक हेतलकुमार प्रवीणचंद्र राज्यगुरुशशांकुमार जैन (कोलकाता), सोमेश चंद्र (नोएडा-उत्तरप्रदेश), वीर ठक्कर (मुंबई), राजीव रंजन (दिल्ली), तरंग अग्रवाल (दिल्ली) यांचा समावेश आहे. नागपूर सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, ओडीशातील एकलव्य मॉडेल निवासी विद्यालयाच्या (ईएमआरएस) कामाची निविदा प्रक्रिया राबविण्यात येत होती. यादरम्यान, वरील सर्व सातही आरोपींनी शाळेच्या कामाचीनिविदा मिळविण्यासाठी कट रचला.

निविदा मिळविण्यासाठी ब्रीज अँड रुप कंपनीचा (इंडिया) लोकसेवक आशिष राजदान याने २० लाखांची लाच मागितली होती. ती लाचेची रक्कम हवालाच्या माध्यमातून देण्यात येणार होती. तक्रार प्राप्त होताच सीबीआयने नागपूर, मुंबई, दिल्ली, नोएडा, कोलकाता आणि राजकोट या शहरात छापेमारी केली. या छाप्यात अनेक महत्वाचे दस्तावेज आणि २६.६० लाखांची रक्कम सीबीआयने जप्त केली. नागपुरातील नरेंद्रनगरातील एका शिक्षिकेच्या घरावर सीबीआयने मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत कारवाई केली. त्या शिक्षिकेचा पतीसुद्धा शाळेच्या निविदेसाठी १९.९६ लाखांची लाच घेतल्याप्रकरणात आरोपी आहे. त्यामुळे लाचेची रक्कम आणि काही दस्तावेज नागपुरातील घरात असल्याची माहिती दिल्ली सीबीआयला होती. शिक्षिकेच्या घरातून काही दस्तावेज, मोबाईल आणि लॅपटॉप सीबीआयने जप्त केला, हे विशेष.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.