चिखलदºयात कार दरीत कोसळली,४ ठार

अमरावती : चिखलदरा – धामणगाव गढी – परतवाडा मार्गावरच्या मडकी गावाजवळील २०० फूट दरीत कार कोसळून झालेल्या भीषण अपघात ४ जणांचा मृत्यू तर ४ जखमी झाले आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. माहितीनुसार, आर्टिका कारमध्ये आदीलाबाद येथील आठ व्यक्ती पर्यटनासाठी चिखलदºयात आले होते, पैकी चार लोकांचा घटनास्थळीच मृत्यू झालेला आहे. उर्वरित चार जखमी आहे. त्यांना दवाखान्यात हलविण्यात आले आहे. सध्या चिखलदारा पोलिस घटनास्थळी पोहोचले असून अधिक तपास सुरु आहे. या अपघातात अर्टिगा वाहन क्रमांक एपी २८ डीडब्ल्यू २११९ या गाडीचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.