ओबीसी आरक्षणाला बाधा पोहचवू नका,अन्यथा…!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : मराठ्यांना आरक्षण देण्यास ओबीसींचा विरोध नाही. परंतु, ओबीसीतून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे. सवर्णांना १० टक्के आरक्षण देतांना शासनाने आधीच मर्यादा ओलांडली आहे. मग, मराठ्यांसाठी मर्यादेचे सोंग कशासाठी ? सत्ताधाºयांनी ओबीसी आरक्षणाला बाधा पोहचवू नये, अन्यथा ओबीसींच्या २४२ जातींच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा गंभीर इशारा ओबीसी संघटनांच्या वतीने देण्यात आला.भंडारा शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील त्रिमूर्ती चौकात १७ सप्टेंबर रोजी विविध मागण्यांसाठी व्यापक निषेध व बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले. सत्ताधाºयांनी ओबीसींचे आरक्षण संपविण्याचा कट रचला आहे. मराठा व ओबीसींत भांडणे लावून दुफळी निर्माण करण्याचे कारस्थान सुरू केले आहे. जे मणीपूरमध्ये केले, तोच प्रकार महाराष्ट्रात करण्याचा मनसुबा आहे. परंतु, ओबीसी सतर्क आहेत, ओबीसींनी रस्त्यावर उतरण्याची तयारी केली आहे. शासनाने लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यासाठी जातनिहाय जनगणना करावी. नचीअप्पन कमिशनच्या शिफारशीप्रमाणे ५० टक्के आरक्षणाची मयार्दा वाढवून आरक्षण देण्यात यावे, अशी मागणीही यावेळी ओबीसी संघटनांनी केली.

निषेध व धरणे आंदोलनाचे नेतृत्व ओबीसी जनगणना परिषद, ओबीसी सेवा संघ, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, ओबीसी क्रांती मोर्चा, युथ फॉर सोशल जस्टीस, ओबीसी जागृती मंच व ओबीसींच्या सर्व जातीय संघटनांनी केले. यावेळी ओबीसी संघटनांचे मुख्य समन्वयक सदानंद इलमे, गोपाल सेलोकर, डॉ. बाळकृष्ण सार्वे, संजय मते, डॉ. मुकेश पुडके, गजानन पाचे, हितेश राखडे, ताराचंद देशमुख,जयंत झोडे, आनंदराव उरकुडे, मंगला वाडीभस्मे, अंजली बांते, जयश्री बोरकर, सुभद्रा झंझाड, अरूण जगनाडे, राजू लांजेवार, वामन गोंधुळे, राकेश झोडे, आनंदराव कुंभरे, बंडू गंथाडे, सेवकराम शेंडे, राजेश मते, छगन ब्राम्हणकर, धनराज पाऊलझगडे, दिलीप ब्राम्हणकर, उमेश मोहतूरे, श्रीकृष्ण पडोळे, सुरेश लंजे, यादवराव कावळे, अशोक दुपारे, योगेश शेंडे, अक्षय लुटे, कैलास राऊत, शंकर दिवटे, कैलास गिरेपूंजे, बाबुराव बिसेन, रामचंद्र राऊत, विनायक हाडगे तसेच मोठ्या संख्येने ओबीसी समाजबांधव उपस्थित होते. सायंकाळी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.