तिन्ही स्वयंपाकी महिला उपोषणावर बसणार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिहोरा : आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सिहोरा येथे कार्यरत असलेल्या महिला स्वयंपाकी यांना खोट्या आरोपातून शाळा व्यवस्थापनाने काढल्यामुळे त्या तिन्ही महिलांनी २१ सपटेंबर पासून आमरण उपोषणावर बसणार असल्याचा इशारा शाळा व्यवस्थापन समिती, शासन व प्रशासनाला १ सप्टेंबर रोजी दिलेल्या एका लेखी निवेदना अन्वये दिला आहे . सुनिता सुरजलाल वाघारे , उषा सुभाष वाघाडे व लक्ष्मी नानेश्वर सोनकुसरे या तिन्ही महिला आदर्श विद्यालय सिहोरा येथे मागील २२ वषार्पासून स्वयंपाकी म्हणून काम करीत होत्या .

शाळा व्यवस्थापनाने त्यांचेवर चोरीचे आरोप लावून त्यांना कामावरून बंद कले आहे. शाळा व्यवस्थापनाने त्यांना कामावरून बंद करण्यापूर्वी कोणतीही पूर्व सूचना न देता किंवा त्यांच्याकडे चोरी केल्याचाकोणताही पुरावा नसतांना त्यांना कामावरून बंद करण्यात आले आहे .त्यांचेवर हेतू पुरस्पर बिन बुडाचे व तथ्यहीन आरोप लावून बंद केले हे बेकायदेशीर आहे . मध्यान भोजनात या तिन्ही स्वयंपाकी महिला चोरी करत असल्याचा आरोप शाळा व्यवस्थापनाने लावला असला तरी शाळा व्यवस्थापनच आम्हाला पोषण आहार कमी पुरवठा करत असल्याचा आरोप स्वयंपाकी महिलांनी केल्यामुळे आदर्श विद्यालय सिहोरा येथील स्वयंपाकी महिला विरुद्ध शाळा प्रशासनाचा वादआता चव्हाट्यावर आला आहे.जर ह्या महिला चोरी करत होत्या तर शाळा प्रशासनाने त्यांना आजपर्यंत कामावर का ठेवले हा प्रश्न चर्चेचा ठरला आहे

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.