‘मेरी माटी मेरा देश’ अभियान, भाजपा महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ गोंदियात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाºया ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानातंर्गत भाजपाच्या महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांनी गोंदियातून माती संकलन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथे वीरांच्या स्मरणार्थ अशोक वाटिका तयार करण्यात येणार आहे. याकरिता ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानाच्या माध्यमातून गावागावातून माती संकलन करण्यात येत आहे. यातंर्गत गोंदिया शहरात राबविण्यात आलेल्या अभियानात भाजपाच्या महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ सहभागी झाल्या. अभियानादरम्यान त्यांनी नागरिकांशी संवाद साधून माती संकलन केले. प्रसंगी केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी माहितीपत्रकाचे वाटप करण्यात आले. दरम्यान त्यांनी माजी आमदार गोपालदास यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. अभियानात उमादेवी गोपालदास अग्रवाल, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा भावना कदम, ग्रामीण तालुकाध्यक्ष माधुरी हरिणखेडे, निर्मला मिश्रा, छाया चव्हाण, सीता रहांगडाले, धर्मिष्ठा सेंगर, शालिनी डोंगरे, स्वाती अग्रवाल, शुभ्रा भारद्वाज आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.