परिपत्रकाची होळी करण्याचा एआयएसएफचा प्रयत्न

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन च्या वतीने दि. ६ सप्टेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र राज्य शासनाने खाजगी कंपणीच्या मार्फत शासकीय कामकाज करण्यासाठी नऊ कंपण्यांना कंत्राट दिले आहे. या निर्णयाविरोधात आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन ने राज्यभर सरकार विरोधात एल्गार पुकारला आहे. त्याचाच एक भाग म्हणून भंडारा जिल्ह्यात देखील आज दिनांक २० सप्टेंबर ला विविध ठिकाणी या शासन निर्णयाची होळी करण्यात आली.मात्र जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा समोर हे करत असताना पोलिसांनी हस्तक्षेप करून हे रोखण्याचा प्रयत्न केला व राज्यसचिव कॉम्रेड वैभव चोपकर यांच्यासह कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. सरकारने घेतलेला हा निर्णय पुर्णपणे गैर संविधानिक असून महाराष्ट्र राज्य सरकारने घेतलेला निर्णय तत्काळ मागे घेण्यात यावा यासाठी समाजातील विविध स्तरातून मागणी केली जात आहे. नोकºयांच्या कंत्राटीकरणातून राज्य सरकारने सामाजिक न्यायाचे तत्व नाकारले आहे. या पद्धतीमुळे शासकीय व्यवस्थेत व कामकाजात भ्रष्ट आणि गैर मार्गाचा अवलंब होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सरकार जनतेची जबाबदारी झटकून लावत असल्याचे यातून उघड झाले आहे. देशासमोरील बेरोजगारी चे अभूतपूर्व संकट निर्माण झाले असताना, कंत्राटीकरणामुळे ते अधिकच व्यापक होत आहे. लाखो रुपये खर्चून शिक्षण संपादन केलेल्या करोडो तरुणांची ही घोर फसवणूक आहे. यामुळे देशाचा तरुण निराशेच्या गर्तेत सापडलेला आहे.

एक बाजूला समाजात धार्मिक व सामाजिक तेढ निर्माण करायचे व नागरी सुविधा व आरक्षणाचा हक्क नाकारायचा हे सरकारचे दुटप्पी धोरण जनविरोधी आहे. सरकारने जणु आपल्याच देशाच्या नागरिकांशी युद्ध पुकारल्याची भावना सर्वसामान्य जनतेत निर्माण झाली आहे. महागाई बेरोजगारी टंचाई ने ग्रस्त जनतेला कापोर्रेट कंपणीच्या दाभाडात घालण्याच्या निर्णयाचा आॅल इंडिया स्टुडंट फेडरेशन च्या वतीने तिवृ धिक्कार करून नोकºयांचे कंत्राटीकरण ,खाजगीकरण रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या जनविरोधी व विद्यार्थी-तरूणविरोधी निर्णय घेणाºया सरकारला २०२४ निवडणुकीत नक्कीच धडा शिकविला जाईल असा इशाराही यावेळी राज्यसचिव कॉम्रेड वैभव चोपकर यांच्यासह विद्यार्थ्यांनी दिला. यावेळी आंदोलनात मोहाडी तालुकाध्यक्ष कॉ. विश्वजित बनकर, कॉ. क्रिस शेंडे, कॉ.भुवन हरडे, कॉ.साक्षी मडावी, कॉ.सलोनी बांबोडे, नेहा कोकोडे, प्राजक्ता मेश्राम,पायल बोरकर, आकांक्षा बागडे, अपेक्षा मेश्राम, सानिया गजभिये, वैष्णवी कंगाले, करिष्मा कोकोडे,पूजा लोहारे, प्रणाली बारेकर ,निकिता बावणे, सागर कारेमोरे, निशिका उरकुडे, मिताली तालेवार, तृप्ती देशकर, निकिता उके यांच्यासह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.