राष्ट्रीय महामार्ग शहापूर येथे ट्रक ला शिवशाहीची धडक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी जवाहरनगर :- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील शहापूर येथील बाजार टोली जवळ गुरुवारी रात्री चालता ट्रक डीव्ह्यायडर तोडून पालटला, सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही तोच आज दुपारी ३.१०.वाजता नागपुर कडून भंडारा कडे जाणारा ट्रक क्रमांक आर. जे. १० जी. ए. ८०९३ याला भरधाव शिवशाही (गाडी क्र. एम. एच. ०९ ई. एम. १५ २४) बस ने मागेहून धडक दिली. यात शिवशाही बस मधील प्रवाश्यांना कुठलेही दुखापत झाली नाही मात्र शिवशाहीचे पुढील काचा फुटल्या. घटना स्थळी लगेच सार्वजनिक आदर्श गणेश उत्सव मंडळाचे कार्यकतेर्नी मदतीसाठी धाव घेतली. या घटनेची नोंद जवाहरनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास ठाणेदार सुधिर बोरकुटे यांचे मार्गदर्शनात पो. का. संदिप बंबावले करीत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.