स्वच्छता ही सेवा अंतर्गत स्वच्छता कर्मचाºयांची आरोग्य तपासणी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : ग्रामीण भागात स्वच्छतेसाठी काम करणाºया सफाई कर्मचाºयांची आज जिल्हाभरात कुटूंबासह आरोग्य तपासणी व गौरव करण्यात आला. स्वच्छता हि सेवा उपक्रमांतर्गत आज सोमवारी (२५ सप्टेंबर) ला सफाई मित्र सुरक्षा दिवस निमित्त सफाई मित्र कर्मचाºयांकरीता आरोग्य तपासणी शिबिर प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर घेण्यात आले. कर्मचाºयांनी आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कार्यक्रमांतर्गत स्वच्छता हि सेवा हा उपक्रम १५ सप्टेंबर २०२३ ते २ आॅक्टोबर २०२३ या कालावधीत जिल्हाभरात राबविण्यात येत आहे. स्वच्छता ही सेवेचा एक भाग म्हणून ग्रामीण भागात स्वच्छतेसाठी काम करणाºया सफाई कर्मचाºयांचा योग्य सन्मान व्हावा. स्वच्छता कर्मचायांबाबतचा सामाजिक दृष्टीकोन बदलावा आणि त्यांच्या कामापासून अनेकांनी स्वच्छतेची प्रेरणा घ्यावी याकरीता आज सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री . समीर कुर्तकोटी यांचे मार्गदर्शनात, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) एम.एस. चव्हाण यांचे नेतृत्वात सफाई मित्र सुरक्षा दिवस कार्यक्रमाचे आयोजन करून जिल्हाभरात प्राथमिक आरोगय केंद्रावर सफाई मित्र कर्मचाºयांकरीता आरोग्य तपासणी शिबिर पार पडले. त्यानंतर त्याच ठिकाणी सफाई कर्मचाºयांचा गौरव करण्यात आला.. भंडारा जिल्हा हागणदारीमुक्त अधिकच्या दिशेने वाटचाल करीत आहे. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करण्याकरीता गावातील स्वच्छता करण्यासाठी स्वच्छता कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नागरिकांची आणि गावांचे आरोगय सांभाळणाºया कर्मचाºयांची कुटूंबांसह आरोगय तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. आज भंडारा अंतर्गत प्राथमिक आरोगय केंद्र धारगाव, पहेला व मोहदूरा येथे पार पडले. उद्या शहापूरआणि खमारी येथे होणारआहे. मोहाडी अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र जांब,आंधळगाव,करडी,बेटाळा,वरठी येथे आरोग्य तपासणी शिबर पाडले. या ठिकाणी कर्मचाºयांची तपासणी करण्यात आली. साकोली अंतर्गत पाचही प्राथमिक आरोग्य केंद्र सानगडी, खांबा , गोंडउमरी, एकोडी, विर्सी तसेच काही उपकेंद्रावर कर्मचाºयांची तपासणी करून गौरव करण्यात आला. लाखांदूर अंतर्गत कुडेगाव, बारव्हा, सरांडी बुज, दिघोरी आदी प्राथमिक आरोगय केंद्र तर सोनी, मढेघाट, पुयार, पिंपळगाव, किरमिटी, विरली बुज आदी उपकेंद्रात तपासणी पार पडली. पवनी पं. स. अंतर्गत कोंढा, सावर्ला, भूयार, आसगाव तसेच लाखनी पं.स. अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रावर आरोग्य तपासणी करण्यात आली. प्राथमिक आरोगय केंद्र व उपकेंद्रावर स्वच्छता कर्मचारी आपल्या कुटूंबासह उपस्थित झालेत. या ठिकाणी वैद्यकिय अधिकाºयांनी त्यांची आरोगय तपासणी करून घेतली. त्यांनतर वैद्यकिय अधिकाºयांचे हस्ते त्यांच्या स्वच्छतेच्या कायार्चा गौरव करण्यात आला. आरोग्य तपासणी शिबिराचे नियोजन गट विकास अधिकारी यांचे मार्गदर्शनात गट संसाधन केंद्राचे गट समन्वयक, समुह सन्वयक, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकाºयांनी केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.