सहकाराचे तत्त्व,जनहिताला महत्त्व

प्रतिनिधी लाखनी : सहकाराचे तत्व जनहिताला महत्व हे ब्रीद वाक्य सार्थक करीत सहकाराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासत बुलढाणा अर्बन बँकेच्या शाखा लाखणी च्या वतीने मृतक कर्जदाराच्या वारसां नाना विमा राशीचे धनादेश वितरित करण्यात आले लाखनी येथील निवासी ताहिर अली मिर मकसूद अली सय्यद यांनी बुलढाणा अर्बन बँकेतून दिनांक १२ मार्च २०२० रोजी पन्नास हजार रुपयाचे वैयक्तिक कर्ज घेतले होते दरम्यान दिनांक १९ मार्च २० २० रोजी व्यावसायिक कामानिमित्त जात असताना भंडारा ते लाखणी राष्ट्रीय महामार्ग वर ताहिर अली सय्यद याच्या अपघाती मृत्यू झाला बँकेच्या वतीने मृतक कर्जदार सभासदाच्या कर्जाच्या व ठेवीदारांच्या ठेवीचा विमा काढण्यात येऊन संरक्षण देण्यात येते सदर अपघाताची माहिती मिळताच बँकेचे व्यवस्थापक विनोद राठोड यांनी सय्यद कुटुंबीयांची भेट घेऊन संस्थेच्या विमा योजनांची माहिती दिली

यावेळी संस्थेचे विभागीय व्यवस्थापक निशांत कोचर यांच्या मार्गदर्शनात सय्यद कुटुंबीयांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन विमा प्रस्ताव आय सी आय सी आय लोम्बार्ड या कंपनीला सादर करण्यात आला विमा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर संस्थेच्या लाखणी शाखांमध्ये एका छोटेखानी कार्यक्रमात मृतकाचे वारसदार त्यांचे भाऊ आबिद अली सय्यद यांना प्रतिष्ठित नागरिक हनीफ भुरा यांच्या हस्ते ५० हजार रुपयाचे विम्याचे धनादेश देण्यात आले याप्रसंगी विभागीय व्यवस्थापक निशांत कोचर व्यवस्थापक विनोद राठोड जावेद लधानी इरशाद खान बँकेचे सभासद कर्मचारी व नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंकुश चव्हाण जगदीश लारोकर राधिका बनसोड व उमेश मोटघरे यांनी प्रयत्न केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *