शेतकरी उत्पादक कंपनी व खरेदी विक्रेते यांचा सुसंवाद

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्हयातील पीक पध्दतीत बहुविविधता यावी ,यासाठी धान पिकांखेरीजही अन्य पिके उत्पादीत करण्यात यावी, अन्नदात्याला जगाच्या बाजारपेठेची ओळख व्हावी यासाठी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हयातील शेतकरी उत्पादक कंपनी व खरेदी विक्रेते यांचा सुसंवाद आज कार्यशाळेच्या माध्यमातून नियोजन सभागृहात झाला. यावेळी कृषी व आत्मा विभागाचे संयुक्त आयोजन रविकिरण पाटील, कृषि समृध्दी शेतकरी उत्पादक कंपनी, श्री.प्रविण वानखेडे, युनिवर्सल, नियार्तादार, श्री. प्रफुल बांडेबुच्चे अध्यक्ष मैत्रेय फार्मर प्रोडुसर कंपनी व श्री.तुषार वरनकर, घरकुल मसाले उत्पादक व श्री.जयंत मावडे, खरेदीदार पुणे यांचे सविस्तर मार्गदर्शन लाभले.दोन सत्रात सहभागी झालेल्या या कार्यशाळेला जिल्हयातील १०० हून अधिक शेतकरी उपस्थित होते. विक्रेता व खरेदीदार यांच्यात सुसंवाद घडवुन खरेदीदारास आवश्यक उत्पादनाचे नियोजन करण्यासाठी आत्मा व कृषी अधिक्षक कार्यालयाने या कार्यशाळेचे आयोजन केले होते.

यासाठी जिल्ह्यातील विक्रेता व खरेदीदार, शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपनी चे सदस्य तसेच उमेदव माविमचे शेतकरी उत्पादक कंपनी मोठया संख्येने उपस्थित होते. शेतक-यांनी बाजारपेठेला आवश्यक असलेले नगदी पीकांचे उत्पादन घ्यावे,जिल्हयातील शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत उत्पादित केलेले धान्य/भाजीपाला तसेच कृषी औजारे,हळद तसेच मध व अन्य औषधे उत्पादीत केली जातात. या कार्यशाळेचे लाईव्ह स्ट्रीमींग करण्यात आले.तसेच या कार्यशाळेनंतर तात्काळ आत्मा व कृषी विभागाने रबी पिकांचे नियोजन देण्याचे जिल्हाधिका-यांनी सूचीत केले.यापूर्वी १३ एप्रिल रोजी सुध्दा अश्याच पध्दतीची कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.