मल्टी मीडिया छायाचित्र प्रदर्शनात केंद्र शासनाच्या विकास कामाचे प्रतिबिंब

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र शासनाने राबविलेल्या योजना तथा विकास कामांचे प्रतिबिंब मल्टी मीडिया छायाचित्र प्रदर्शनीत दिसत आहे. वंचितांना प्राधान्य ही गेल्या नऊ वषार्तील सुशासनाची ओळख बनली असल्याचे प्रतिपादन खासदार सुनिल मेंढे यांनी आज केले.जिल्हा प्रशासन व क्षेत्रीय सूचना व प्रसारण कार्यालयाव्दारे बसस्टॅण्डवर आयोजित मल्टी मीडिया छायाचित्र प्रदर्शनीच्या उदघाटनाप्रसंगी केले. यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलिस अधिक्षक लोहित मतानी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा कुरसुंगे तसेच शिक्षणाधिकारी माध्यमिक संजय डोर्लीकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक रविंद्र सोनटक्के,तसेच सूचना प्रसार अधिकारी सौरभ खेकडे, यांच्यासह पत्रकार व महिला बचतगटाच्या सदस्य मोठा प्रमाणावर उपस्थित होते.

केंद्र सरकारच्यावतीने आरोग्य, शिक्षण तसेच शेतीला प्राधान्य देऊन विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आझादी का अमृत महोत्सव ,मिशन इंद्रधनुष्य व पोषण आहार योजनेबाबत या प्रदर्शनात छायाचित्र तसेच व्हिडीओचे सादरीकरण करण्यात आले. तसेच देशातील प्रत्येक गरजू,वंचित घटक आणि वंचित क्षेत्राला सुविधा देण्यासाठी केंद्र व राज्य शासन वेगाने काम करत आहे. तसेच शेतकºयांचे उत्पन्न वाढवणे, शेतीचा खर्च कमी करणे, शेतकºयांना बियाण्यांपासून ते बाजारपेठे पर्यंतच्या आद्युनिक सुविधा उपलब्ध करुन देणे हे शासनाचे प्राधान्य आहे. महिलांच्या सर्वागिण विकासासाठी नेतृत्वाखाली विकास हा दृष्टिकोन घेऊन गेली ९ वर्षात देश प्रगतीपथावर वाटचाल करत आहे. आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमीत्त तृणधान्याची लागवड करावी लागतात. लहान बाळांच्या आरोग्यासाठी भरडधान्य युक्त पदार्थांचा त्यांच्या आहारात समावेश कराव यासाठी पालकांनी जागृकता बाळगावी असे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी यावेळी सांगितले. जिल्हा पोलिस अधिक्षक लोहित मतानी यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.या प्रदर्शनीत सेल्फी पॉईटमध्ये उपस्थितांनी सेल्फी काढली.ही प्रदर्शनी २७ सप्टेंबरपर्यत असून सर्व नागरिकांनी याला भेट देण्याचे आवाहन क्षेत्रीय सूचना व प्रसारण कार्यालयाने केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.