माज्या मुलाचा अपघाती मृत्यू नसून घातपातचा संशय

तालुका प्रतिनिधी मोहाडी : भंडारा जिल्ह्याच्या पारडी या गावातील सागर मोहतुरे ह्या १९ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मात्र आपल्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला नसून गावातील सहकार्यांनी घातपात केल्याचा संशय व्यक्त करीत सागरच्या कुटुंबीयांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे. जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यालगत पारडी नावाचे छोटंस गाव आहे. या गावात माधो मोहतुरे यांची पत्नी, दोन मुली व एक मुलगा असं शेतकरी कुटुंब वास्तव्यास आहे. अल्पशा शेतीवर संसाराचा गाडा चालत नसल्याने माधो हे गावातील इतरांची शेतीही ठेक्यानं करत. सागरची वडिलांना चांगली मदत होती. शिवाय सागर सैन्य व पोलीस भरतीची तयारी करत होता. यामुळे गावात त्याच्या हुशारीचे उदाहरण दिले जात असे. घटनेच्या दिवशी १९ आगस्ट गावातील दोन मित्र दुचाकी घेऊन सागरला तालुक्याच्या ठिकाणी जाऊ म्हणून घेऊन गेले. गावाबाहेर आणी एका दुचाकीवर तीन मित्र वाट पाहत होते.

दोन्ही दुचाक्या गावाबाहेर निघाल्या मात्र तालुक्याच्या ठिकाणी न जाता जवळच असलेल्या गावाजवळील नाल्याकडे गेल्या. नाल्यात सर्वानी पोहण्याचा बेत केला. सर्व पाण्यात उतरले यात सागरचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. मात्र सागरचा अपघाती मृत्यू झाला नसून सहकार्यांनी त्याचा घातपात केला असा आरोप सागरच्या कुटुंबीयांनी केला आहे. यात गावातील तीन मित्राचा सहभाग असा संशय व्यक्त करीत सखोल चौकशीची मागणी मोहाडी पोलिसांना तक्रारीत केली आहे. मात्र दोन महिने लोटूनही कुठलीच कारवाई झाली नसल्याचे मोहतुरे कुटुंबियांचे म्हणणे आहे. करीता लवकरात लवकर चौकशी करून न्याय देण्यात यावा अशी मागणी सागरचे आई, वडील माधो मोहतुरे व बहीण सीमा मोहतुरे यांनी केली आहे. सदर प्रकरणाची तक्रार दाखल करून घेण्यात आली आहे.

अनेकांचे बयान नोंदविण्यात आले आहे. मात्र अदयाप काही सुगावा लागला नाही. तरी पुढील तपास सुरु असल्याचे मोहाडी पोलीस निरीक्षक निशांत मेश्राम यांनी सांगितले. सागर हा हुशार असल्याने अनेक लोकं त्याला जळत होते. सागर सैन्य भरतीला चंद्रपूर येथे गेला असता गावातील त्याच्या एका सहकाºयाने धावताना धक्का दिला होता. यावरून वादही झाले होते असे सागरच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *